धक्कादायक! बाल्कनी तुटताच दणादणा जमिनीवर आदळले लोकं, Viral Video पाहून तुमचाही थरकाप उडेल
वरून पडलेली कोणतीही गोष्ट ही खाली येतेच हे तर तुम्ही ऐकलेच असेल मात्र यात माणसंही सामील आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? याचीच प्रचिती देणारा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका इमारतीच्या अपार्टमेंटमध्ये लोक एकामागून एक आकाशातून खाली जमिनीवर आदळताना दिसून येत आहेत. हे सर्व दृश्य पाहून आता अनेकजण आवाक् झाले आहेत. नक्की प्रकरण काय आहे सविस्तर जाणून घेऊयात.
काय आहे व्हिडिओत?
वास्तविक, व्हायरल झालेला व्हिडिओ एका सीसीटीव्ही फुटेजचा आहे, ज्यामध्ये अनेक लोक इमारतीच्या अपार्टमेंटमध्ये फिरताना दिसत आहेत. वातावरण एकदम शांत आणि आल्हाददायक आहे. प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त असतो. मात्र अचानक तिथे मुसळधार पाऊस पडतो आणि हा पाऊस पाण्याचा नसून माणसांचा असतो. होय, लोक आकाशातून इमारतीच्या खाली जमिनीवर एकामागून एक पडू लागतात आणि पडतच राहतात. आजूबाजूला फिरणाऱ्या लोकांना कोणी पडण्याचा आवाज येताच ते धावत येऊन त्यांना पाहायला उभे राहतात. आता हे सर्व नक्की कसं घडलं? याविषयी जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – बापरे! व्यक्तीने बाईकच्या पेट्रोल टाकीत फटका टाकून पेटवला अन् मग जे झालं… धक्कादायक Video Viral
व्हिडिओमध्ये पडलेले लोक आकाशातून पडले नसून फ्लॅटच्या बाल्कनीतून पडले आहेत. वरवर पाहता, हे लोक बाल्कनीत उभे राहून दारू पीत होते किंवा मजा करत होते, तेव्हा बाल्कनीची रेलिंग तुटली आणि सर्वजण खाली पडले. आश्चर्याची बाब म्हणजे एवढ्या उंचीवरून पडल्यानंतरही यातील एक जण उठला आणि तेथून थेट पळत सुटला, ज्याला पाहून लोक आश्चर्यचकित झाले. बाकीचे मात्र यावेळी जमिनीवर पडून राहिले. लोक पडल्यानंतर धूळ आणि चिखल झाला आणि त्यांच्यासोबत बाल्कनीचे रेलिंगही पडले. या घटनेत जखमी किंवा जीवितहानी झाल्याची माहिती सध्या तरी उपलब्ध नसली तरी सोशल मीडियावर हा व्हिडिओ फार धुमाकूळ घालत आहे.
Human waterfall after nightclub balcony collapses 💀💀 pic.twitter.com/qYiTgo3A74
— Second before disaster (@NeverteIImeodd) October 27, 2024
हेदेखील वाचा – काका ऑन फायर! डोक्यावर ठेवला जळता फटाका अन् शेवटी… Viral Video पाहून तुम्हीही हैराण व्हाल
हा व्हायरल व्हिडिओ @NeverteIImeodd नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘नाईट क्लबची बाल्कनी कोसळल्यानंतर मानवी धबधबा दिसला’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला 20 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत देखील मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “भावा कॅमेऱ्याच्या सर्वात जवळ असलेली स्त्री तिच्या चेहऱ्यावर पडली, ती वाचली नसावी” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “लोकांनी जी प्रतिक्रिया दिली ती विचित्र आहे, नुसते उभे राहणे, मदत न करणे हे अविश्वसनीय आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.