दिवाळीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. हिंदू धर्मात या सणाला फार महत्त्व आहे. दिवाळी म्हटलं की, घराची साफसफाई, नवीन कपडे, फराळ या सर्व गोष्टी आल्याचं आणि यात देखील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवाळीचे फटाके. दिवाळीत दिव्यांच्या रोषणाईसहित फटाक्यांच्या गडगडाट देखील सर्वत्र घुमत असतो. लोक या सणाची इतक्या आतुरतेने वाट बघत असतात की आठवड्याभरापासून याच्या तयारीला सुरुवात होते.
फटाके फोडताना नेहमी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना वारंवार नागरिकांना दिल्या जातात मात्र दरवर्षी काही अतिउत्साही फटक्यांसोबत असा काही जीवघेणा थरार करू पाहतात की नंतर त्यांच्याच त्यांना याचा पाश्च्याताप करणे भाग पडते. अनेकदा फटाक्यांशी केलेली ही मजा लोकांच्या जीवावर देखील बेतत असते. सध्या यासंबंधीचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक व्यक्ती चक्क आपल्या डोक्यावर जळता फटका ठेवताना दिसून येत आहे. हे संपूर्ण दृश्य इतके थरारक आहे की पाहून तुम्हीही हैराण व्हाल. अनेकांना हा व्हिडिओ पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे.
हेदेखील वाचा – अद्भुत-अविश्वसनीय! मगर हरणाला खाणार तितक्यात घडलं असं काही, उलटे पाय करून पळू लागली मगर, Video Viral
काय आहे व्हिडिओत?
यावर्षीच्या दिवाळीची सुरुवात एका काकांची फार जोमात केल्याचे दिसून येत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण भररस्त्यात दिवाळीचा आनंद लुटता पाऊस (फटका) लावण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. हा फटका लावून तो बाजूला होईल तितक्यात तिथे एक काका येतात आणि थेट जळता पाऊस आपल्या डोक्यावर ठेवतात. हे सर्व दृश्य पाहून क्षणार्धासाठी का होईना पण हृदयात धस्स झाल्यासारखे वाटते. पुढे हा फटका जाळतो आणि पाऊसचा संपूर्ण उंचच्या उंच ज्वलंत प्रकाश काकांच्या डोक्यावर झळकताना दिसून येतो. मुख्य म्हणजे, असे करताना त्यांना कोणतीही वेदना जाणवत नाही. हा सर्व प्रकार पाहून तुम्हीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही.
हेदेखील वाचा – इतक्या जवळून मरण बघितलंय का कधी? घराच्या बाहेर येताच घडलं असं काही… धडकी भरवणारा Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @whatthe.duck__meme नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘पॉवर ऑफ ओल्ड मॉन्क’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला 4 लाखाहून अधिक लोकांनी पपाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “बावा बोंब असता तर केसांबरोबरच त्वचाही नाहीशी झाली असती” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पुन्हा एकदा सिद्ध झाले की, इंडिया इज नॉट फॉर बिगिनर्स”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.