अरे बापरे! इथे केली जाते पालींची शेती, पण कशी? भयानक दृश्ये पाहून तुम्हालाही येईल किळस; Video Viral
जगात असे अनेक प्राणी आहे ज्यांना पाहताच आपल्याला त्यांच्यापासून दूर जावेसे वाटते. अनेकदा हे प्राणी आपल्यासाठी घातक देखील ठरू शकतात. असाच एक प्राणी म्हणजे पाल. या पालीला तुम्ही अनेकदा घराच्या भिंतींवर सरपटताना पाहिले असेल. आकाराने लहान दिसत असली तरी ही पाल विषाने भरलेली असते ज्यामुळे तिला जवळ करणं बरंच महागात पडू शकतं. मात्र आज आम्ही तुम्हाला जगातील अशा काही देशांविषयी माहिती सांगत आहोत जिथे चक्क या पालीची शेती केली जाते. होय, तुम्ही बरोबर ऐकले, अनेकदा जिला आपण घरातून बाहेर काढण्याचे प्रयत्न करतो काही देशांत या पाळीची शेती केली जाते. या धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे जो वेगाने व्हायरल होत आहे.
कुठे आणि कशी केली जाते पालींची शेती?
व्हिडिओनुसार, ही पालींची शेती इंडोनेशिया, थायलँड आणि मलेशिया यांसारख्या देशांमध्ये पालींची शेती केली जाते. टोकेकॅको प्रजातीच्या पाली त्यांच्या औषधी गुणधर्मांमुळे ओळखल्या जातात. या पाली जंगलात किंवा जुन्या घरांमध्ये पकडल्या जातात. दोन मीटर लांबीची एक काठी असते जिच्या साहाय्याने लोक या पाली पकडतात. एवढेच काय तर त्यांना पकडून त्यांची देखभाल देखील केली जाते. यासाठी निरोगी आहार आणि वातावरण तयार केले जाते. तेथील लोकांसाठी हा उपक्रम रोजगाराचा एक उत्तम मार्ग बनला आहे.
रेल्वे स्टेशनवरच पत्नीने पतीला केली मारहाण, एका फटक्यात उचलले आणि जमीवरच नेऊन आपटले; Video Viral
स्थानिक लोक एका रात्रीत पाली पकडून एक हजार ते दोन हजार रुपये कमावतात. दुर्मिळ पाली आणि सरडे विकून पन्नास हजार ते एक लाख लाखाहून अधिक पैसे कमावले जातात. टोकेकॅको या प्रजातीची मोठ्या किमतीत विक्री केली जाते. दमा, संधिवात, त्वचा रोग याच्या औषधांमध्ये या पालींचा, त्यांच्या अवयवांचा वापर केला जातो. ही घटना फार अजब असून आता ती सोशल मीडियावर ती वेगाने व्हायरल होत आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @nupoortv नावाच्या युट्युब अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये पालींच्या शेतीविषयीची सर्व माहिती देण्यात आली आहे. तसेच यात काही दृश्येही दाखवण्यात आली आहेत जी पाहून तुम्हाला खरंच किळस येईल. ही अजब-गजब शेती आणि त्यातून मिळणारे भरमसाठ उत्पन्न आता अनेकांना थक्क करत आहे. व्हिडीओच्यात शेवटी तुम्ही ही पालींची शेती करणार का? असा प्रश्नही विचारण्यात आला आहे. यावर एकाने कमेंट्स करत रिप्लाय केला आहे की, “नको बाबा मला नाही करायची पालींची शेती”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.