Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जागतिक मंचावरच भिडले AI च्या दुनियेतील ‘हे’ दिग्गज; समिटमधीत त्या कृतीने खळबळ, VIDEO VIRAL

सोशल मीडियावर एआय समिटमधील एक अत्यंत रंजक पण तितकाच विचित्र प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एआयच्या दुनियेतील दिग्गज जागतिर मंचावरच भिडले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 19, 2026 | 04:15 PM
OpenAI Anthropic rivalry

OpenAI Anthropic rivalry

Follow Us
Close
Follow Us:
  • जागतिक मंचावरच भिडले AI च्या दुनियेतील ‘हे’ दिग्गज
  • समिटमधीत त्या कृतीने खळबळ
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
OpenAI Anthropic Rivalry : दिल्लीत १६ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी पर्यंत इंडिया इम्पॅक्ट सिमटचे आयोजन करण्यात आले आहे. ही समिट भारतासाठी आणि ग्लोबल साउथच्या विकासासाठी अत्यंत महत्वाची मानली जात आहे. दिल्लीत भारत मंडपम येथे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद लोक, ग्रह, विकास या तीन मूल्यांवर आधारित आहे. सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय असे याचे घोषवाक्य असून बल साउथमध्ये पहिल्यांदाच या मोठ्या AI परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक दिग्गजांचा समावेश आहे.

या परिषदेत जगातील दोन सर्वात मोठ्या एआय कंपन्यांचे प्रमुखही आले आहे. Open AI चे सॅम आल्टमन आणि Anthropic चे डारियो अमोदेई देखील उपस्थित होते. परंतु या दोघांमध्ये एक रंजक तितकाच आश्चर्यकारक प्रसंग घडला. जागतिक मंचावर दिग्गजांच्या फोटो सेशन दरम्यान दोन्ही कंपन्यांच्या मालाकांमधील बिझनेस रायव्हलरी स्पष्टपणे दिसून आली. या प्रसंगाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांनी याला AI Cold War म्हटले आहे.

नेमकं काय घडलं?

या एआय समिटच्या चौथ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक टेक लीडर्सची भेट घेतली. यावेळी त्यांनी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले. टेक लीडर्स ग्रुप फोटेदरम्यान नरेंद्र मोदींच्या दोन्ही बाजूला होते. यावेळी सर्व लीडर्सने ऐक्याचे प्रतीक म्हणून हातात हात धरून वर केले होते. पंतप्रधान मोदींच्या एका बाजुला गुगलचे सीईओ सुंदर पिचाई तर दुसऱ्या बाजूला सॅम अल्टमन उभे होते. आश्चर्याची बाब म्हणजे एआयच्या दुनियेतील कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांच्या बाजूला उभे राहिले होते.

Open AI चे सॅम आल्टमन आणि Anthropic चे डारियो अमोदेई जेव्हा एका बाजूला उभे राहिले त्यांनी एकमेकांचा हात धरणे टाळले. दोघांनी केवळ Fist Bump pose दिली. हा विचित्र प्रसंग कॅमेरात कैद झाला असून याला एआय च्या दुनियेतील कोल्ड वॉर म्हटले जात  आहे. या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून मीम्सचा पूर आला आहे.

AI Summit 2026: AI समिटमधून Bill Gates ने घेतली माघार, देणार नाही भाषण; का घेतला इतका मोठा निर्णय

व्हायरल व्हिडिओ

This is so hilarious. Nothing can make Sam and Dario hold hands, not even the Prime Minister of India! pic.twitter.com/aRKsjSFXM9 — Yuchen Jin (@Yuchenj_UW) February 19, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून अनेकांनी याला एआयच्या दुनियेतील करण-अर्जुनांचा वाद म्हटले आहे, तर जोपर्यंत हे दोन दिग्गज एकत्र येत नाही तोपर्यंत एआयचा विकास होणार नाही अशा सध्या चर्चा सुरु आहे.  डारियो अमोदेई एकेकाळी OpenAi चे व्हाइस प्रेसिडेंट ऑफ रिसर्च होते, परंतु २०२१ मध्ये कंपनीच्या धोरणांवरुन त्यांचा सॅम अल्टमॅनसोबत वाद झाला. यानंतर डारियो यांनी कंपनी सोडली आणि Anthropic नावाची स्वत:ची कंपनी सुरु केली. तेव्हापासून दोन्ही दिग्गजांमध्ये स्पर्धा सुरु झाली.

AI Impact Expo 2026: AI समिट भारतासाठी ठरणार गेमचेंजर! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज होणार उद्घाटन, वाचा सविस्तर

Web Title: India ai impact summit 2026 sam altman dario amodei awkward moment openai anthropic rivalry video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • AI technology
  • narendra modi
  • Sam Altman

संबंधित बातम्या

Modi-Netanyahu मैत्रीत फुट? भारताचे संयुक्त राष्ट्रात इस्रायलविरोधी मोठे पाऊल; पाकिस्तानला दिली साथ
1

Modi-Netanyahu मैत्रीत फुट? भारताचे संयुक्त राष्ट्रात इस्रायलविरोधी मोठे पाऊल; पाकिस्तानला दिली साथ

India AI Impact Summit: Microsoft ची मोठी घोषणा; ‘ग्लोबल साऊथ’मध्ये ५० अब्ज डॉलर्सची एआय गुंतवणूक
2

India AI Impact Summit: Microsoft ची मोठी घोषणा; ‘ग्लोबल साऊथ’मध्ये ५० अब्ज डॉलर्सची एआय गुंतवणूक

AI देणार स्पीड ट्रॅकिंग सिस्टीमला गती! चालानपासून वसुलीपर्यंत सर्वकाही होणार स्वयंचलित
3

AI देणार स्पीड ट्रॅकिंग सिस्टीमला गती! चालानपासून वसुलीपर्यंत सर्वकाही होणार स्वयंचलित

AI Summit : पंतप्रधान मोदी आज करणार शिखर परिषदेचे उद्घाटन; इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह अनेक नेते राहणार उपस्थित
4

AI Summit : पंतप्रधान मोदी आज करणार शिखर परिषदेचे उद्घाटन; इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह अनेक नेते राहणार उपस्थित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.