
Indian Man shares shocking video of newyork goes viral
आपल्या भारतात रस्त्यांवरील खड्डे आता सामान्य समस्या झाली आहे. हे एक कधीही न संपणारी समस्या आहे. यामुळे भारतात अनेकदा जनता आणि सरकारमध्ये वादही झाले आहेत. कारण या खड्ड्यांमुळे अनेकदा अपघात घडतात. सर्वात जास्त त्रास तर पावसाळ्यात होता. या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यावर तर खड्डा कुठे आहे हे दिसत नाही आणि अपघात होता. तसेच यामुळे अनेक रोगही पसरतात. यामुळे अनेक लोक भारतात सर्व गोष्टी चांगल्या असल्या तर अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे चांगल्या राहणीमानासाठी परदेशात जातात. पण तुम्हाला माहित आहे का की परदेशातील जी दृश्ये आणि पाहतो, जे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहतो. अनेकदा वास्त काही वेगळेच असते. सध्या असाच एक अमेरिकेतील सर्वात सुंदर शहराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामुळे एक धक्कादायक गोष्ट समजली आहे.
एका भारतीय व्यक्तीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये न्यूयॉर्कच्या रस्त्यांवरही खड्डे पाहायला मिळत आहेत. या व्यक्तीने व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरमध्ये एका ठिकाणी रस्त्यांवर खड्डे आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की त्यांमध्ये पाणी साचलेले दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, भारतातच नाही, तर परदेशातही अशी अवस्था आहे. येथे रस्त्यांवर खड्डे आहेत, त्यामध्ये पाणी साचले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, परदेशातील सर्वात सर्वोत्तम शहरात देखील काही त्रुटी आहेत. सर्व काही सोशल मीडियावर पाहतो, तसे ग्लॅमरस नसते.
पप्पा, पप्पा…! वरातीत लहानग्यासारखे ढसाढसा रडू लागला नवरदेव; कारण काय तर भावाने…, पाहा मजेशीर VIDEO
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @gaurav_mishra_talks या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकजण हा व्हिडिओ पाहून हैराण झाले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, तरी पण भारतापेक्षा बरेच आहे, तर दुसऱ्या एकाने न्यूयॉर्कच नाही, तर अमेरिकेच्या इतर शहरांमध्ये देखील अशी परिस्थिती आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पांचट Jokes : वाईन शॉप आणि कॉफी शॉपमध्ये फरक काय आहे? रामू चे उत्तर ऐकून पोट धरुन हसाल…
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.