पप्पा, पप्पा...! वरातीत अचानक लहानग्यासारखे ढसाढसा रडू लागला नवरदेव; कारण काय तर भावाने..., पाहा मजेशीर VIDEO (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Groom Viral Video : सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. तर कधी असे व्हिडिओ पाहायला मिळतात की हसू आवरणे कठीण होऊन जाते. सध्या लग्नाचा सीझन सुरु आहे. यामुळे सोशल मीडियावर त्या संबंधी अनेक मजेशीर व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. कुठे डान्सचे, तर कुठे वरातीतले व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामध्ये एका नवरदेवाचा एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये नवरदेव अचानक ढसाढसा रडायला लागला आहे. पण तो ज्या पद्धतीने रडत आहे ते पाहून लोक हैराण झाले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक वरात सुरु आहे. नवरदेव रथात बसला आहे. त्याच्या बाजूला एक चिमुकला बसला आहे. याच वेळी अचानक नवरदेवाचा भाऊ येतो आणि काहीतरी रागात बोलून जातो. त्यानंतर तरुण अचानक रडायला लागतो. तुम्ही व्हिडिओ पाहू शकता की एखाद्या लहान मुलासारखा हट्टीपण नवरदेव करत आहे. हात आपटून, पप्पा, पप्पा म्हणत रडत आहे. त्याच्या बाजूला बसलेला चिमुकला त्याला बघून हसत आहे. यावेळी अचानक म्युझिकही बंद झाले आहे. नवरदेवाला असे पाहून वरातीतले लोक आश्चर्यचकित झाले आहेत.
व्हायरल व्हिडिओ
भाई की डाँट ने ऐसा असर किया कि दूल्हा रोने लगा 😭
बारात में म्यूज़िक बंद, सब हैरान…😂 pic.twitter.com/5H6eih7FkB — Shagufta khan (@Digital_khan01) November 14, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Digital_khan01 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, बिचाऱ्या नवरीचे काय होईल, देव जाणे! तर दुसऱ्या एकाने नवरदेवाचा सर्वांसमोर अपमान झाला, बाबो असे म्हटले आहे. आणखी एका नेटकऱ्याने बँड बाजा बारात… नवऱ्याचा इमोशनल ड्रामा! असे म्हटले आहे. हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
Next Level जुगाड! बाईकवर बसवली खाट, त्यात पठ्ठ्याचा राजेशाही थाट; पाहून युजर्स हैराण, Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






