राधिकाचा हळदीतील लूक एका इंफ्लूएंसरने रिक्रिएट केला आहे.
काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि त्याची गर्लफ्रेंड राधिका मर्चंट यांनी लग्नगाठ बांधली. त्यांचा हा शाही विवाहसोहळा फार चर्चेचा विषय बनला. लग्नातील एकूण एक गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होती. यावेळी त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांवरही अनेकांचे लक्ष केंद्रित होते. यावेळी राधिकाने आपल्या हळदीत घेतलेली हटके खऱ्याखुऱ्या फुलांची ओढणी त्यावेळी फार व्हायरल झाली. तिची ही युनिक स्टाइल अनेकांच्या फार पसंतीस पडली.
राधिकाची ही फुलांची ओढणी ताज्या कळ्यांपासून बनवण्यात आली होती. ज्यामध्ये तगरच्या कळ्या वापरल्या होत्या आणि झेंडूच्या फुलांनी बॉर्डर बनवली होती. त्यातच तिच्या या ओढणीची किंमत 20,000 हुन अधिकची सांगण्यात आली होती. मात्र आता राधिकाची ही ओढणी एका इंफ्लूएंसरने चक्क 2000 रुपयांत बनवून दाखवली आहे. या इंफ्लूएंसरचे नाव आरुषी पाहवा आहे, तिने 10-12 दिवसांत सेम टू सेम ओढणी तयार करून दाखवली आहे. याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो सध्या फार चर्चेत असून बराच व्हायरल झाला आहे.
हेदेखील वाचा – धक्कादायक! पुण्यात एका महिलेला बेदम मारहाण, नाकातून रक्त अन् Video होतोयं Viral
आरुषीने सांगितले की, जेव्हा तिला हा दुपट्टा बनवण्याबद्दल समजले तेव्हा कोणीतरी ते बनवण्यासाठी 15,000 रुपये मागितले तर कोणी स्पष्टपणे नकार दिला. यानंतर आरुषीने स्वतः हा दुपट्टा तयार करण्याचे ठरवले. तिने छतरपूर फुल मार्केटमध्ये जाऊन या फुलांच्या कळ्या खरेदी केल्या. या फुलांना डोडा फुले म्हणतात. 2 मीटर लांबीचा धागा घेऊन सुईच्या साहाय्याने धाग्यावर फुलांचे थ्रेडिंग सुरू केले. 12 समान तार बनवल्यानंतर, आरुषीने या फुलांना झिग-झॅग पॅटर्नमध्ये लावण्यास सुरुवात केली. शेवटी झेंडूच्या फुलांनी बॉर्डर करून दुपट्टा पूर्ण केला.
आरुषीने तयार केलेल्या या ओढणीची आता सोशल मीडियावर फार चर्चा होत आहे. अनेकांद्वारे तिचे कौतुक करण्यात येत आहे. यावेळी आरुषीने हुबेहूब राधिका सारखा लूक करून दाखवला आहे, जो पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. यावेळी आरुषीने सल्ला देत सांगितले की, ही ओढणी खऱ्या फुलांपासून बनवली असल्याने ही लवकर खराब होते म्हणजेच त्याची फुले काळी पडू लागतात. म्हणूनच फ्लॉवर ओढणी बनवल्यानंतर तिला रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.
आता या ओढणीचा रिक्रीएट लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. याचा व्हिडिओ @arushipahwa नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी ही कल्पना फार आवडली आहे आणि या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत आपल्या वेगवगेळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.