
आता भाज्यांऐवजी फ्रिजमध्ये ठेवले जाणार माणूस? जपानचा 'हा' VIDEO पाहून फिरून जाईल डोके!
बेहोष समजून जवळ गेला अधिकारी, अन् तितक्यात बिबट्याने घेतली झेप! अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
फ्रिजच्या आत १५ डिग्री तापमान
Do Hiemon Box ला उष्णतेने हैराण झालेल्या लोकांच्या मदतीसाठी तयार करण्यात आले आहे. कंपनीच्या मते, बॉक्सच्या आत शरीराच्या वरच्या भागाला सुमारे ५ अंश सेल्सिअस थंड हवा दिली जाते, तर संपूर्ण कूलिंग कॅबिनेटचे तापमान सुमारे १५ अंश सेल्सिअस राहते. यात कूलिंग आणि एअरफ्लोसाठी तीन वेगवेगळे मोड्स दिले गेले आहेत. कंपनीचा दावा आहे की, साधरण १० मिनिटे यात बसल्यानंतर शरीराचे तापमान वेगाने कमी होण्यासाठी आणि उष्माघाताची लक्षणे कमी होण्यास मदत होऊ शकते.
२० मिनिटांनंतर ऑटोमॅटीक फ्रिज होतो बंद
या मशीनमध्ये सुरक्षेचीही खास काळजी घेतली गेली आहे. Do Hiemon Box हा साधरण २० मिनिटांनंतर आपोआप बंद होऊन जातो, ज्यामुळे फार यात थंडाव्याचा ओव्हरफ्लो होत नाही. सामान्य मोबाईल एअर कंडिशनरच्या तुलनेत अंदाजे निम्मी ऊर्जा ही मशीन वापरते असा दावा कंपनीद्वारे करण्यात आला आहे. मशीनच्या खाली चाक बसवण्यात आली आहेत ज्यामुळे फार सहजपणे मशीनला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येते.
🚨Japan unveils Human Refrigerator to help workers beat extreme summer heat. pic.twitter.com/p298lrhCdr — Indian Infra Report (@Indianinfoguide) July 23, 2026
‘मित्र’ समजून भरवत होता चिकन, मगरीने जबड्यात पकडले दोन्ही पाय; १ तास चालला संघर्ष…घटनेचा Video Viral
किंमत किती?
चला आता येऊया याच्या किमतीकडे… या ‘ह्यूमन रेफ्रिजरेटर’ला सध्या कंपन्या आणि सरकारी संस्थांना लक्ष्य करून बनवण्यात आले आहे. याची किंमत साधरण १५ लाख जपानी येन म्हणजेच ९,२०० डाॅलर्स इतकी सांगितली जात आहे. या मशीनला डिस्ट्रीब्यूटर्सच्या मदतीने उपलब्ध करुन दिले जाईल. सध्या या मशीनला सामान्य घरातील वापरासाठी तयार करण्यात आलेले नाही. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर सामान्य घरांसाठीही याला उपलब्ध करुन दिले जाईल.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.