(फोटो सौजन्य: X)
पाण्यासाठी पाकिस्तानी सैनिकांमध्येच जुंपली, जवानांनी एकमेकांना ओढत केली तुफान हाणामारी; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
विचार करा तुम्ही एकाच्या मदतीला जात आहात आणि त्यानेच तुमच्यावर हल्ला केला तर तुम्हाला कसं वाटेल. गाडीच्या धडकेत जेव्हा बिबट्या घायाळ झाला तेव्हा त्याच्या मदतीसाठी रेस्क्यू टीम दाखल झाली. त्यांनी बिबट्याला बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन त्याला आपल्या ताब्यात करण्याचा प्रयत्न केला. रेस्क्यू टीमला वाटले की, बिबट्या शांत झाला आहे पण औषध पूर्णपणे शरीरात पसरेल त्याआधीच बिबट्याने वन अधिकाऱ्यावर हल्ला चढवला. त्याने आपल्या पंजांनी अधिकाऱ्याला जमिनदोस्त केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे वन अधिकारी थक्क झाले आणि त्यांनी बिबट्याला ताब्यात करण्याचा प्रयत्न केला. इतक्यात आजूबाजूची लोकही मदतीला धावून आली. बिबट्याने गवताच्या दिशेने जात फरार होण्याचा प्रयत्न केला होता पण वन अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत बिबट्याला सुरक्षितरित्या आपल्या ताब्यात घेतले. उपचारासाठी त्याला जवळील पशु रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Davangere, Karnataka: Injured Leopard Attacks Forest Official During Rescue An injured leopard, hit by a car on a highway in Davangere, suddenly pounced on a forest official during a rescue operation. The team had tranquilised the animal, but the sedative had not fully taken… pic.twitter.com/xFQWFVuzDF — Deadly Kalesh (@Deadlykalesh) September 8, 2026
या घटनेचा व्हिडिओ @Deadlykalesh नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. अनेक यूजर्सने व्हिडिओतील दृष्यांवर कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “बिबट्याला वाचवायला गेलेल्या रेस्क्यू टीमवरच हल्ला होणं खरंच धक्कादायक आहे.”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बिबट्याने रेस्क्यू टीमलाच सांगितलं, “आज रेस्क्यू नाही, तुमची टेस्ट आहे!”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “रेस्क्यू टीम: आम्ही तुला वाचवायला आलोय. बिबट्या: मला नाही, आधी स्वतःला वाचवा!.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.






