Jessica Simpson drinks of snake sperms for a better voice Famous singer's claim creates a stir, Viral News
अमेरिकेतली प्रसिद्ध गायिका जेसिका सिम्पसनने एक मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. आपला आवाज कायम चांगला रहावा यासाठी आपण एक खास ड्रिंक घेत असल्याचं तिने सांगितले आहे. मात्र या ड्रिंकमध्ये ती काय टाकते हे समजल्यावर जगभरातील फॅन्स चक्रावले आहेत. संपूर्ण जगभर तिच्या या खुलास्याने खळबळ उडाली आहे. जेसिकाने एका मुलाखतीदरम्यान यासंदर्भात माहिती दिली. या मुलाखतीचा व्हिडिओ तिने स्वतःच आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरुन शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
जेसिकाने मुलाखतीदरम्यान सांगितले आहे की, ती आपला आवाज चांगला रहावा यासाठी ती काही चिनी औषधी वनस्पतींचे मिश्रण असलेला काढ्याचे सेवन करते. मात्र धक्कादायक बाब म्हणजे या काढ्यासोबत ती चक्क सापाचं वीर्य, म्हणजेच स्नेक स्पर्मदेखील असते. या ड्रिंकचं सेवन करण्याचा सल्ला तिला तिच्या व्होकल कोचने दिला असल्याचे तिने मुलाखतीत स्पष्ट केले आहे. तसेच, आपल्याला देखील यामध्ये काय-काय आहे याबाबत आधी माहिती नव्हती. मात्र नंतर खरे काय ते समजले असेही ती म्हणाली.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जेसिका हसत-हसत या सर्व गोष्टींची माहिती देत आहे. हे औषधी ड्रिंक अगदी मधाप्रमाणे गोड लागते असेही ती सांगते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जेसिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर @jessicasimpson शेअर केला आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत सोशल मीडियावर नेटकरी आणि जेसिकाचे फॅन्स यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. बहुतांश नेटकऱ्यांनी या सर्व प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे. एका युजरने म्हटले आहे की, ‘एखादी व्यक्ती एवढी निष्काळजी कशी असू शकते?’, तर दुसऱ्या एकाने ‘आम्हाला आधी तू आवडत होतीस..’ असे म्हटले आहे. तसेच अनेकांनी धक्कादायक अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एखाद्या सेलिब्रिटीने आपल्या त्वचेसाठी, आवाजासाठी किंवा फिटनेससाठी अशा प्रकारच्या विचित्र गोष्टींचं सेवन करण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वी ‘साल्मन स्पर्म फेशिअल’ देखील ट्रेंडमध्ये होते. यामध्ये लोक साल्मन माशाचे स्पर्म चेहऱ्यावर इंजेक्ट करतात. अँटी-एजिंग ट्रीटमेंटसाठी याचा फायदा होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. सध्या जेसिकाच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.