
रिल पडली महागात! ३० फुटांवरून धरणात मारली उडी, दोन्ही पाय मोडले! रुग्णवाहिकेतून म्हणाला- 'पुन्हा कधीही स्टंट करणार नाही'
‘मित्र’ समजून भरवत होता चिकन, मगरीने जबड्यात पकडले दोन्ही पाय; १ तास चालला संघर्ष…घटनेचा Video Viral
पाणी कमी असल्याकारणाने दुखापत झाली
मिळालेल्या माहितीनुसार, राक्सा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परवाई गावातील पुष्पेंद्र कुमार रविवारी आपल्या मित्रांसोबत पहूज धरणावर फिरायला गेला होता. सांगितले जात आहे की, सर्वजण जाऊन तिथे जाऊन रिल बनवत होते. यावेळीच पुष्पेंद्र कुमार धरणाच्या डाव्या बाजूच्या असणाऱ्या व्हू पाॅईंटवर पोहचला आणि त्याचे मित्र दुसऱ्या बाजूला उभे राहून त्याचा व्हिडिओ शूट करु लागले. पुष्पेंद्रने धरणाची संरक्षक भिंत चढून, खाली न पाहता सुमारे ३० फूट उंचीवरून धरणात उडी मारली. व्हिडिओ शूट करताना पुढे पुष्पेंद्रसोबत काय घडलं याची कुणालाही कल्पना नव्हती. उडी मारल्यानंतर पुष्पेंद्र अशा ठिकाणी जाऊन आदळला जिथे पाणी कमी होते. यामुळेच तो गंभीर जखमी झाला आणि त्याच्या दोन्ही पायांना दुखापत झाली. अपघातानंतर आजूबाजूला एकच गोंधळ उडाला. अनेकांना वाटलं की, धरणात पडून त्याचा मृत्यू झाला असावा पण या अपघातातून पुष्पेंद्र सुखरुप बचावला गेला.
🚨 YOUTH BREAKS BOTH LEGS WHILE FILMING REEL A 32-year-old man reportedly jumped from around 30 feet into Pahuj Dam in Jhansi, Uttar Pradesh while attempting to film a video reel on Sunday evening. Instead of landing in deeper water, he fell onto a shallow, rocky surface,… pic.twitter.com/B4BNYHjLtX — contentkikamii (@contentkikamii) September 7, 2026
१० हजार फुटांवरून कोसळली स्कायडायव्हर, तरीही वाचला जीव! अंगावर काटा आणणारा Video Viral
पोलिस घटनेस्थळी दाखल झाली
अपघातानंतर ग्रासलँड चौकीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घायाळ पुष्पेंद्रला धरणातून बाहेर काढले. रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली ज्यानंतर पुष्पेंद्रला एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. माहिती मिळताच तरुणाचे कुटुंबिय देखील रुग्णालयात दाखल झाले. या घटनेतून रिल्स आणि व्हायरल होण्याच्या नादात जीव धोक्यात घालण्याचे गंभीर परिणाम समोर आले आहेत. धरण, नदी किंवा उंच ठिकाणी स्टंट करताना परिस्थितीचा अंदाज न घेता घेतलेले एक पाऊल जीवघेणे ठरू शकते. या घटनेचा व्हिडिओ @contentkikamii नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.