
जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
काय घडलं व्हिडिओतय़
सदर घटना ही जोधपूरमधील खुडियाला गावात घडल्याचे सांगण्यात येत आहे. समाजाच्या नियमांच्या विरुद्ध जाऊन प्रेमसंबंध ठेवल्याबद्दल एका प्रियकर-प्रेयसीला मोठी शिक्षा करण्यात आली. पुन्हा कुणी प्रेमाचा विचारही आपल्या मनात आणू नये यासाठी त्या दोघांचीही गावात धिंड काढण्यात आली. सार्वजनिकरित्या त्याला मारहाण केली आणि नंतर दोघांचेही केस कापून त्यांना टक्कल करण्यात आली. तिथे उपस्थित एकाने ही घटना आपल्या फोनमध्ये कैद केली आणि याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला, ज्यानंतर ही घटना समोर आली. माहितीनुसार,ग्रामीण पोलीस अधीक्षकांनीही या घटनेची दखल घेतली असून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. पोलिसांनी याविरोधात गुन्हा दाखल केला असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई होण्याची आशा आहे.
Jodhpur, Rajasthan – A video purportedly showing a young man and woman being publicly humiliated over their alleged relationship has surfaced on social media, raising questions about the treatment of couples who choose to marry or maintain relationships outside traditional social… pic.twitter.com/k6pAJXPJ3T — NextMinute News (@nextminutenews7) September 23, 2026
ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
दरम्यान घटनेचा हा व्हिडिओ @nextminutenews7 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती शेअर करण्यात आली असून व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “प्रेम केलं म्हणून अशाप्रकारे सार्वजनिक अपमान करणे अत्यंत चुकीचे आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जग कितीही पुढे गेलं तरी लोकांनी मानसिकता बदलणार नाही”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “बापरे, हे जरा अतीच झाले”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.