
भोलेनाथासाठी भक्तीची पराकाष्ठा! लोखंडी खिळ्यांवर झोपून कावड यात्रा करणाऱ्या भक्ताचा Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, रस्त्यावर दोन वेगवेगळे चाैथरे ठेवण्यात आले आहेत. एक चौथरा चार चाकांवर ठेवलेला आहे, ज्यावर कावड, म्हणजेच पवित्र पाण्याचे भांडे ठेवलेले आहे. त्याच्या अगदी बाजूलाच टोकदार लोखंडी खिळ्यांनी जडवलेला दुसरा चौथरा आहे. पिवळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला भक्त याच खिळ्यांच्या चाैथऱ्यावर झोपून आपली कांवड यात्रा पूर्ण करत असतो. व्यक्तीसोबत आणखी एकजण असतो जो खिळ्यांनी भरलेला हा चाैथरा पुढे ढकलण्यास मदत करतो. चाैथऱ्यावर झोपून मग उठून परत चाैथरा पुढे ढकलला जातो आणि मग पुन्हा व्यक्ती यावर झोपतो अशा प्रकारे ही यात्रा पूर्ण केली असते.
खिळ्यांच्या चाैथऱ्यावर झोपताना व्यक्तीच्या डोळ्यात भितीचा किंवा वेदनेचा एक लवलेशही दिसत नाही. इंटरनेटवर सध्या हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत असून यूजर्सने व्हिडिओतील दृष्यांवर आपल्या संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी भक्ताची पराकाष्टा पाहून जय जय भोलेनाथ जयघोष केला आहे तर काहींनी याला निव्वळ बावळटपणा म्हटले आहे. स्वत:ला त्रास देऊन तुम्ही देवाला आनंदी करु शकत नाही असे काहींनी म्हटले आहे.
A viral video from Uttar Pradesh’s Aligarh district has showcasing an extreme act of faith during the holy month of Sawan. To please Lord Shiva, a devotee has embarked on his ‘Hath-Kanwar’ pilgrimage by lying down on a custom-made wooden platform embedded with sharp iron nails. pic.twitter.com/iQlXK8vNvA — Truth India Live (@Truthindialive) August 12, 2026
घटनेचा हा व्हिडिओ @Truthindialive नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर ट्रेंड करत असून व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “भोलेनाथावरील श्रद्धा मान्य आहे, पण अशा प्रकारे स्वतःला इजा करून भक्ती करण्याची गरज काय?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जाईपर्यंत त्याच्या शरीराचे काय हाल होतील”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “हर हर महादेव! भक्तीची ताकद पाहून थक्क झालो”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.