(फोटो सौजन्य: Pinterest)
नासाच्या मते, खगोलशास्त्रज्ञ जिओव्हानी शियापारेली यांनी १८६५ मध्ये या धूमकेतूला पर्सेइड्स उल्कावर्षावाचा स्रोत असे म्हटले होते. या धूमकेतूची शोध १८६२ मध्ये लुईस स्विफ्ट आणि होरेस टटल यांनी लावला होता. याला सूर्याचा एका फेरा पूर्ण करायला तब्बल १३३ वर्षांचा कालावधी लागतो आणि १९९२ मध्ये त्याने शेवटची सूर्यमालेच्या आतील भागाला भेट दिली होती.
लक्षात घ्या, उल्का-वर्षा स्विफ्ट-टटल (Swift-Tuttle) हा धूमकेतूने मागे सोडलेल्या अवशेषांमुळे होतो. याचे क्रेंद्र फार मोठे असते आणि याचा व्यास १६ मील (२६ किमी) इतका असतो. यावेळी १२ ऑगस्टच्या रात्रीपासून ते १३ ऑगस्टच्या सकाळपर्यंतचा काळ पीक नाइट्स म्हणून ओळखला जातो. हा काळ उल्का वर्षाव पाहण्यासाठी एकदम सर्वोत्तम मानला जातो. यावेळी चंद्र अमावस्येत असेल ज्यामुळे आकाशावर संपूर्णपणे काळ्या रंगाची चादर पसरलेली पाहायला मिळेल. याकाळात तुम्हाला हलके तारे देखील चमकताना सहज दिसू शकतात. सांगितले जात आहे की, याकालात भरपूर उल्कापिंड दिसून येणार आहेत.
जर तुमचे नशीब चांगले असले आणि हवामान निरभ्र असेल, यासोबतच जर तुम्ही पोल्युशन फ्रि परिसरात राहत असाल तर तुम्हाला एका तासात ५० ते १०० हून अधिक उल्का दिसू शकतात. यावर्षी त्यांना पाहण्यासाठी परिस्थिती फार अनुकूल आहे कारण त्यावेळी अमावस्या असणार आहे, म्हणजेच चंद्राचा प्रकाश नसणार आहे ज्यामुळे उल्का सहजपणे दृष्यमान होऊ शकतात.
‘५ लाख घ्या, पण भावाला वाचवा…’; भावाच्या डोळ्यांसमोर कांवडिया गंगेत बुडाला, हृदयद्रावक Video Viral
उल्का पाहण्यासाठी भारतातील सर्वोत्तम ठिकाणे
उल्का पाहण्यासाठी निरभ्र आकाश अनुकूल मानले जाते. भारतात हानले, लडाख, उंच प्रदेशातील पर्जन्यछायेचे प्रदेश , स्पिती व्हॅली आणि राजस्थानमधील थर वाळवंटाचा शुष्क विस्तार ही ठिकाणे उल्का पाहण्यासाठी सर्वाेत्तम मानले जातात.






