(फोटो सौजन्य: Instagram)
‘५ लाख घ्या, पण भावाला वाचवा…’; भावाच्या डोळ्यांसमोर कांवडिया गंगेत बुडाला, हृदयद्रावक Video Viral
व्हिडिओ व्हायरल
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता यात काही तरुण पुलावर लटकून स्टंट करताना दिसून येतात. खाली खाडी तर वरुन भरधाव वेगाने रेल्वे जात असते पण भितीचा एक लवलेशही यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर नसतो. चुकून जरी यावेळी कुणाचा हात फिसकटला तर मोठा अनर्थ होऊ शकतो. ही घटना इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असून यूजर्सने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. भविष्यात असे आणखी प्रकार घडू नयेत यासाठी तरुणांवर कारवाई होणे गरजेचे आहे असे काहींचे मत आहे.
सुरक्षेवर प्रश्न
विशेष म्हणजे, जर हा व्हिडिओ खरा असेल तर एवढ्या संवेदनशील रेल्वे परिसरात हे तरुण पोहोचले कसे? त्यांना पुलाच्या परिसरात प्रवेश मिळाला कसा, त्याठिकाणी सुरक्षारक्षक किंवा निगराणी यंत्रणा होती का, तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून अशा हालचालींवर लक्ष ठेवले जाते का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
भाईंदर आणि नायगावदरम्यानचा रेल्वे मार्ग अत्यंत महत्त्वाचा असून, खाडीवरील रेल्वे पूल हा सामान्य नागरिकांसाठी मुक्त प्रवेशाचा परिसर नाही. अशा ठिकाणी अनधिकृत प्रवेश झाल्यास संबंधित व्यक्तींसह रेल्वे वाहतुकीच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो. यापूर्वीही रेल्वे परिसरातील धोकादायक प्रकारांचे व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. त्यामुळे या व्हिडिओची सत्यता तपासून, तो खरा असल्यास संबंधित तरुणांवर कारवाई करण्याबरोबरच रेल्वे पुलाच्या सुरक्षेचा आढावा घेण्याची मागणी होत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, नायगाव-भाईंदर परिसरातील रेल्वे आणि खाडीशी संबंधित पायाभूत सुविधांबाबत यापूर्वीही विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत. नायगाव खाडीवर भविष्यात मेट्रो आणि वाहनांसाठी दुमजली पूल उभारण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी मिळाली आहे. आता या व्हायरल व्हिडिओमुळे रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा याबाबत नेमकी काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.






