Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय बोलणार याला! भरमंडपात वधूचा लग्नाला नकार; बॉयफ्रेंड येताच वराच्या हातात ठेवलं मंगळसूत्र अन्… Video Viral

मला हे लग्न जमणार नाही! वर मंगळसूत्र घालणार तितक्यात वधूने लग्नाला दिला नकार. भरमंडपातून बॉयफ्रेंडसोबत काढला पळ आणि मग पुढे काय घडले ते आता तुम्हीच पाहा, याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 25, 2025 | 02:11 PM
काय बोलणार याला! भरमंडपात वधूचा लग्नाला नकार; बॉयफ्रेंड येताच वराच्या हातात ठेवलं मंगळसूत्र अन्... Video Viral

काय बोलणार याला! भरमंडपात वधूचा लग्नाला नकार; बॉयफ्रेंड येताच वराच्या हातात ठेवलं मंगळसूत्र अन्... Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन! असं म्हणतात की, मुलींसाठी लग्न म्हणजे एका नव्या आयुष्याची सुरुवात असते. भारतात फार थाटामाटात आणि उत्साहात लग्नसोहळे पार पाडले जातात. याच लग्नात अनेक मजेदार गोष्टी घडून येत असतात, ज्यांचे व्हिडिओज शेअर केले जातात. प्रत्येकाला आपल्या लग्नाची हौस असते, कित्येक महिन्यांपासून लग्नाची तयारी सुरु असते मात्र अशातच काहीवेळा अघटित घडून येत आणि ही सर्व मजा धुळीला मिळते. आजकाल जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत लग्नाची शाश्वती देता येत नाही. लग्नसमारंभातील एक धक्कादायक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे ज्यात एका वधूने चालू विवाहसोहळ्यात लग्नाला नकार दिला आणि मग आपल्या बॉयफ्रेंडसोबत ती निघून गेली. याचा व्हिडिओ आता सर्वत्र धुमाकूळ घालत आहे.

एका झटक्यात भयानक प्राण्याने बकरीला केले गिळंकृत, काही सेकंदाची शिकार अन् दृश्यांनी संपूर्ण इंटरनेट हादरलं; Video Viral

ही घटना चित्रपटातील कोणत्या सीनहुन कमी वाटत नाही. लग्नाचा मंडप सजवला होता, पुजारी मंत्र म्हणत होते, नातेवाईकांच्या नजरा वधू-वरांवर होत्या आणि वातावरण आनंदाने भरून गेले होते. पण नंतर, सर्वांच्या अपेक्षांवर पाणी फेरत, वधूने असे काही केले ज्याची कोणीही कल्पनाही केली नव्हती. शेवटच्या क्षणी, जेव्हा फक्त सात फेरे शिल्लक होते, तेव्हा वधूने लग्न करण्यास नकार दिला. तिने स्पष्टपणे सांगितले की तिला हे लग्न करायचे नव्हते. कुटुंब, समाज किंवा नातेवाईकांची पर्वा न करता, तिने आपला मुद्दा मांडला. हा निर्णय इतका अचानक आणि जोरदार होता की सर्वांनाच धक्का बसला. अनेकांना आश्चर्य वाटले, तर काहींनी तिच्या धाडसाचे कौतुकही केले.

ही घटना कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील बुवनहल्ली गावात घडून आली आहे. पल्लवी नावाच्या मुलीने लग्न अलूर तालुक्यातील रहिवासी वेणुगोपालशी निश्चित झाले होते. मात्र जेव्हा वर मंगळसूत्र हातात घेऊन गळ्यात घालणार तितक्यात ती लग्नाला नकार देते आणि सर्वत्र शांतता पसरते. मुलीच्या पालकांनी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, नातेवाईकांनीही आपापल्या पद्धतीने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण पल्लवीने कुणाचेही काही ऐकले नाही आणि आपल्या बॉयफ्रेंडसोबत तिने येथून पळ काढला.

Karnataka: Bride Pallavi refused to marry at the last moment, saying she loves someone else.She walked out of the wedding venue with her lover under police protection pic.twitter.com/6JbaeHhd2z

— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) May 24, 2025

आ गया स्वाद! गाढवाला मारहाण करत होता; तितक्यात प्राण्याने धरले पाय अन् घडवली जन्माची अद्दल ; Video Viral

ही घटना सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. घटनेचा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. घटनेच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची माहिती देण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 1.8 मिलियनहुन अधिकचे व्युज मिळाले असून अनेकांनी याच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “एवढ्या शेवटपर्यंत ती का थांबली होती” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “चेहरा का झाकायचा? ती सर्वत्र भारतीय मुलींसाठी एक उत्तम उदाहरण मांडत आहे. कधीही न होण्यापेक्षा उशिरा बरे – तिने जे बरोबर होते ते केले”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Karnataka bride refused to marry and walked out of the mandap with her boyfriend shocking video goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2025 | 01:54 PM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video
  • Wedding Video

संबंधित बातम्या

एक चूक अन्…! ओव्हरटेकच्या प्रयत्नात कारची स्कूटीला जोरदार धडक; अन् तरुण थेट हवेत…,VIDEO VIRAL
1

एक चूक अन्…! ओव्हरटेकच्या प्रयत्नात कारची स्कूटीला जोरदार धडक; अन् तरुण थेट हवेत…,VIDEO VIRAL

इसे कहते है मौत को छूकर टक से वापस आना! छतावरुन थेट गाडीवर कोसळला पठ्ठ्या…; पुढे जे घडलं पाहून विश्वास बसणार नाही, Video Viral
2

इसे कहते है मौत को छूकर टक से वापस आना! छतावरुन थेट गाडीवर कोसळला पठ्ठ्या…; पुढे जे घडलं पाहून विश्वास बसणार नाही, Video Viral

काळजात धडकी भरवणारा क्षण! अचानक भल्या मोठ्या ट्रकखाली आली तरुणी…; पुढे जे घडंल भयानक, Video Viral
3

काळजात धडकी भरवणारा क्षण! अचानक भल्या मोठ्या ट्रकखाली आली तरुणी…; पुढे जे घडंल भयानक, Video Viral

खाली पाडलं, ओरबाडलं, लचके…; भटक्या कुत्र्यांचा चिमुकलीवर भयावह हल्ला, VIDEO पाहून उडेल थरकाप
4

खाली पाडलं, ओरबाडलं, लचके…; भटक्या कुत्र्यांचा चिमुकलीवर भयावह हल्ला, VIDEO पाहून उडेल थरकाप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.