आ गया स्वाद! गाढवाला मारहाण करत होता; तितक्यात प्राण्याने धरले पाय अन् घडवली जन्माची अद्दल ; Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी आश्चर्यात पाडणारे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, भांडण, यांसारखे अनेक व्हिडिओ सतत व्हायरल होतात. तसेच प्राण्यांशी संबंधित देखील अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. काही व्हिडिओ अगदी चित्तथरारक असतात. अनेक वेळा माणूस प्राण्याशी गैरवर्तन करतानाचे देखील व्हिडिओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील. असे व्हिडिओ पाहून राग अनावर होतो. परंतु आज एका तरुणाला प्राण्याशी गैरवर्तन करणे महागात पडले आहे. या प्राण्यानेच त्याला असा धडा शिकवला आहे की, पुन्हा कधी तरुण कोणत्या प्राण्यासोबत गैरवर्तन करण्याचा विचार देखील करणार नाही.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, एक तरुण गाढवाला मारताना दिसत आहे. तो गाढवाच्या कानाखाली मारतो, तसेच त्याच्या पाठीवर दोन-तीन बुक्क्या देखील मारतो. नंतर तरुण गाढवावर बसण्याचा प्रयत्न करतो. पण पुढे जे घडतं यामुळे तरुणाला चांगलाच धडा मिळाला असणार आहे. खर तर गाढवाला लोक आळशी प्राणी समजतात. त्याचा वापर सामानाची ने-आण करण्यासाठी होतो. अनेकदा गाढवाला लोक मारत असतात अशा वेळी गाढव उत्तर देत नाही. पण या गाढवाने तरुणाला चांगलाच झटका दिला आहे. तरुण गाढवावर बसताच गाढव उडी मारते, यामुळे तरुण खाली पडतो. त्यानंतर गाढव तरुणाचा पाय तोंडात धरुन फरपट घेऊन जाते. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
— People getting kill*d daily🔞 (@KnowIedg3) May 19, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @KnowIedg3 या अकाउंटवर व्हाटरल होत आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने “मानव समजूतदार आहे, पण प्राणी देखील खूप निष्ठावान असतात” असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने “जे तुम्ही पेरता तसेच कापता” असे म्हटले आहे. आणखी एका युजरने गाढव तर चतुर निघाले असे म्हटले आहे. तर अनेकांनी गाढवाला मारणाऱ्या तरुणावर संताप व्यक्त केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनल आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.