मृत्यूच्या रिंगणात उतरले किंग कोब्रा अन् अजगर, थरारक दृश्ये पाहून काळीज हलेल, Video Viral
सर्वात भयानक आणि खतरनाक प्राण्यांपैकी अजगर आणि किंग कोब्रा हे दोन प्राणी आहेत. दोन्ही प्राणी आपल्या तरबेज आणि चपळ शिकारीसाठी ओळखले जातात. दोन्हींमधील विष इतके घातक असते की, त्यांचा एक डंक जरी कुणाला लागला तर तो व्यक्ती तिथेच मृत्युमुखी पडू शकतो. हेच कारण आहे की, त्यांना पाहताच प्राणीच काय तर माणसंही दुरूनच पळून जातात. आता प्रश्न असा येतो की, ही दोन धोकादायक प्राणी जेव्हा एकमेकांच्या आमने-सामने येतील तेव्हा काय घडेल? तुम्ही कधी अजगर आणि किंग कोब्राची लढत पाहिली आहे का? नसेल तर मग आजच्या या व्हायरल व्हिडिओतून तुम्हला ही जबदस्त लढत पाहायला मिळणार आहे.
सोशल मीडियावर प्राण्यांच्या जीवनाशी निगडित अनेक वेगवगेळे व्हिडिओज व्हायरल होत असतात. यात बऱ्याचदा त्यामध्ये रंगलेला जीवघेणा खेळदेखील व्हायरल होत असतो. सध्या अशाच मृत्यूच्या रिंगणात उतरलेल्या किंग कोब्रा आणि अजगराच्या जबरदस्त लढतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मृत्यूच्या खेळात कोण जिंकलं हे आता तुम्हीच पाहा.
हेदेखील वाचा – धक्कादायक! भररस्त्यात तरुण महिलेसोबत करू लागला बळजबरी, सीसीटीव्हीत घटना कैद, Video Viral
व्हिडिओत दिसते की, कोब्रा अजगराला दंश करण्याचा प्रयत्न करत असतो. पण अजगराने त्याचा जबडा ताकदीने पकडला आहे. अजगराने किंग कोब्राच्या पूर्ण शरीरावर पीळ घातला. त्यामुळे काही केल्या कोब्राचे विष बाहेर येईना आणि शेवटी गुदमरून सर्वात विषारी सापाचा अंत होतो. अजगराने हुशारी दाखवत अवघ्या काही मिनिटात एका खतरनाक सापावर सहज विजय मिळवला. हा व्हिडिओ सध्या सोशल मेडियावर धुमाकूळ घालत आहे. अनेकजण आता हा व्हिडिओ पाहून आवाक् झाले आहेत.
हेदेखील वाचा – माणसाची कृती पाहून घुबड झाला शॉक, केलं असं काही… 1 कोटींहून अधिक लोकांनी पाहिला Viral Video
हा व्हायरल व्हिडिओ @rijeshkv_80 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आले आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपले मतदेखील मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “दुसरा साप तर अजगर आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “म्हणूनच असे म्हणतात की कधीही गर्व करू नये” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मोठ्या भावाशी पंगा नसतो घ्यायचा”.