सोशल मीडियावर पशु-पक्षयांचे अनेक निरनिराळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये प्राणी-पक्षांच्या जीवनाशी निगडित अनेक गोष्टी पाहायला मिळतात. यातील प्राण्यांच्या कृती पाहून कधी आपल्याला कधी आश्चर्याचा धक्का बसतो तर कधी थक्क व्हायला होते. असे व्हिडिओ अनेक लोकांना पाहायला फार आवडतात आणि याच कारणास्तव असे प्राणी पक्षांचे व्हिडिओ व्हायरल होतात. सध्या असाच एक विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होताना दिसून येत आहे.
तुम्ही सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पाहिले असतील मात्र सध्या व्हायरल होत असल्लेया घुबडाचा व्हिडिओ खरोखर फार रोचक आहे. यात काही लोक घुबडाला वाचवताना दिसत आहेत. यात घुबडाची कृती पाहून आता अनेकजण त्याच्या प्रेमात पडले आहेत. हा व्हिडिओ सध्या फार वेगाने व्हायरल होत आहे. यात नक्की काय आहे? याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – ‘मी अध्यक्षाचा मुलगा आहे’ म्हणत तरुण काढत होता तरुणीची छेड, घडली अशी अद्दल की… एकदा पहाच Viral Video
व्हिडिओमध्ये आपल्याला काहीसा जंगलातील भाग दिसत आहे. यात एका व्यक्तीला घुबड दिसतो. हा व्यक्ती त्या घुबडाकडे जातो आणि त्याला प्रेमाने गोंजारु लागतो. घुबड मात्र स्तब्धपणे हे सर्व पाहत राहतो. घुबड लोकांकडे कसे अवाक होऊन पाहत आहे हे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचे एक्स्प्रेशन इतके मजेशीर आहेत की ते पाहून तुम्हाला आता अनेकजण या व्हिडिओची मजा घेत आहेत. लोक त्याच्यावर एवढ्या प्रेमाचा वर्षाव करत आहेत यावर त्याचा विश्वास बसत नाही, अशा नजरेने तो सर्वकाही अनुभवत राहतो. हा व्हिडिओ आता युजर्सना चांगलाच आवडल्याचे दिसून येत आहे.
🦉: Why are they not fearing me, I’m big and fluffy pic.twitter.com/z5MAydRaXj
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) October 1, 2024
हेदेखील वाचा – बापरे! कोकिळेचे बाळ भल्यामोठ्या गिरगिटाला गिळू लागले, पाहून आईही थक्क, Viral Video पाहून हैराण व्हाल
हा व्हायरल व्हिडिओ @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स काउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 1 कोटींहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट्स करत घुबडावर आपल्या प्रेमाचा वर्षावदेखील केला आहे. एका युजरने लिहिले आहे, ” एका यूजरने लिहिले- अरे देवा! हे घुबड किती मोठे आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे देखील खूप गोंडस आहे”, आणखीन एका युजने लिहिले आहे, ” निसर्ग खरोखर खूप सुंदर आहे”.