Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

kurla Couple Attack: कुर्ल्यात धक्कादायक प्रकार! तरुण जोडप्यावर अल्पवयीन मुलांचा बेल्ट-काठी, दगडाने हल्ला, मारहाणीचा VIDEO व्हायरल

kurla Couple Attack Video: मुंबईतील कुर्ला पश्चिम येथील फिनिक्स मार्केटसिटी मॉलजवळील एका उद्यानात तरुण-तरुणीवर ८ ते १० अल्पवयीन मुलांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. फोटो काढत असलेल्या कपलला दगड, बेल्ट आणि लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला....

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 21, 2026 | 12:36 PM
कुर्ल्यात धक्कादायक प्रकार! तरुण जोडप्यावर अल्पवयीन मुलांचा बेल्ट-काठी, दगडाने हल्ला, मारहाणीचा VIDEO व्हायरल

कुर्ल्यात धक्कादायक प्रकार! तरुण जोडप्यावर अल्पवयीन मुलांचा बेल्ट-काठी, दगडाने हल्ला, मारहाणीचा VIDEO व्हायरल

Follow Us
Follow Us:
  • मुंबईच्या कुर्ल्यात धक्कादायक प्रकार!
  • फोटो काढणाऱ्या कपलवर ८ ते १० अल्पवयीनांचा हल्ला
  • दगड, बेल्ट आणि लाकडी दांडक्याने मारहाण
kurla Couple Attack : मुंबईतील कुर्ला पश्चिम परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुर्ल्यातील फिनिक्स मार्केटसिटी मॉलजवळील महापालिकेच्या उद्यानात फोटो काढत असलेल्या एका तरुण-तरुणीवर ८ ते १० अल्पवयीन मुलांनी हल्ला केल्याची घटना समोर आली. या हल्ल्यात तरुणीला दगड, बेल्ट आणि लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.( kurla Couple Attack Video)

फोटो काढत असताना कपलला घेरले

मिळालेल्या माहितीनुसार, २० नोव्हेंबर रोजी कुर्ला पश्चिम येथील फिनिक्स मॉलजवळील एका उद्यानात तरुण आणि तरुणी फोटो काढत होते. यावेळी ८ ते १० अल्पवयीन मुलांचा एक गट तेथे आला. सुरुवातीला त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर या गटाने तरुण-तरुणीला घेरून मारहाण करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात दगड, बेल्ट आणि लाकडी दांडक्याचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. तरुणीच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने वार करण्यात आला. तरुणालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत असल्याचे सांगितले जात आहे.

Viral Video: घरात मुलगी एकटी असताना खिडकीतून हात आला, नंतर दरवाजा….; पुढे जे घडलं ते धक्कादायक! VIDEO व्हायरल

मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या घटनेचे काही स्थानिक नागरिकांनी मोबाईलमध्ये शूट केले, त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे तरुण-तरुणीला मारहाण झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली जात आहे. तरुणीने घाटकोपर पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आठ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

किरीट सोमय्या यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही या घटनेचा व्हिडीओ आपल्या एक्स (X) अकाउंटवर शेअर केला आहे. त्यांनी या घटनेला ‘मुस्लिम गुंडगिरी’ असे संबोधत धार्मिक रंग दिला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, फिनिक्स मॉल परिसरात मुस्लिम कट्टरपंथीयांनी हिंदू मित्रांवर हल्ला केला.

सोमय्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 189(2), 189(4), 118(1), 352 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पाच अल्पवयीन मुलांच्या पालकांना नोटीस बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी ते दुपारी ४ वाजता घटनास्थळी भेट देणार असल्याचेही त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.

सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या घटनेमुळे मुंबईतील सार्वजनिक उद्याने आणि मोकळ्या जागांमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी सुरक्षितपणे वावरता यावे, यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा, पोलिसांची गस्त आणि तातडीने कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. दरम्यान, या घटनेमागील नेमके कारण, हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्वांची भूमिका आणि धार्मिक स्वरूपाबाबतचे दावे यांची स्वतंत्र पुष्टी होणे बाकी आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासातूनच घटनेचे संपूर्ण वास्तव स्पष्ट होणार आहे.

Famous Hippo Dies : धक्कादायक! विणलेली टोपी गिळली अन् जगप्रसिद्ध पाणघोडी फिओनाचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुंबईतील कुर्ला येथे कपलवर हल्ला कुठे झाला?

    Ans: मुंबईतील कुर्ला पश्चिम येथील फिनिक्स मार्केटसिटी मॉलजवळील एका महापालिका उद्यानात ही घटना घडल्याची माहिती आहे.

  • Que: तरुण-तरुणीवर कशा प्रकारे हल्ला करण्यात आला?

    Ans: फोटो काढत असलेल्या तरुण-तरुणीवर ८ ते १० अल्पवयीन मुलांनी दगड, बेल्ट आणि लाकडी दांडक्याने हल्ला केल्याचा आरोप आहे. तरुणीच्या डोक्यावरही लाकडी दांडक्याने वार करण्यात आल्याचे व्हिडीओमध्ये दिसत असल्याचे सांगितले जात आहे.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: तरुणीच्या तक्रारीनंतर घाटकोपर पोलिसांनी आठ अल्पवयीनांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. तसेच पाच अल्पवयीन मुलांच्या पालकांना नोटीस बजावण्यात आल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.

Web Title: Kurla phoenix mall park minors attack couple stone belt wooden stick mumbai sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 12:36 PM

Topics:  

  • crime
  • kurla
  • police
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: घरात मुलगी एकटी असताना खिडकीतून हात आला, नंतर दरवाजा….; पुढे जे घडलं ते धक्कादायक! VIDEO व्हायरल
1

Viral Video: घरात मुलगी एकटी असताना खिडकीतून हात आला, नंतर दरवाजा….; पुढे जे घडलं ते धक्कादायक! VIDEO व्हायरल

Peru Earthquake: तीन देश हादरले! पेरूमध्ये 6.7 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; इक्वेडोर आणि कोलंबियापर्यंत जाणवले धक्के, VIDEO VIRAL
2

Peru Earthquake: तीन देश हादरले! पेरूमध्ये 6.7 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; इक्वेडोर आणि कोलंबियापर्यंत जाणवले धक्के, VIDEO VIRAL

Indonesia : इंडोनेशियात भरधाव ट्रेनने मिनीबसला उडवले; चालक जिवंत जळाला, पण कसे वाचले 264 प्रवाशांचे प्राण? पहा VIRAL VIDEO
3

Indonesia : इंडोनेशियात भरधाव ट्रेनने मिनीबसला उडवले; चालक जिवंत जळाला, पण कसे वाचले 264 प्रवाशांचे प्राण? पहा VIRAL VIDEO

Famous Hippo Dies : धक्कादायक! विणलेली टोपी गिळली अन् जगप्रसिद्ध पाणघोडी फिओनाचा मृत्यू
4

Famous Hippo Dies : धक्कादायक! विणलेली टोपी गिळली अन् जगप्रसिद्ध पाणघोडी फिओनाचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.