Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video: घरात मुलगी एकटी असताना खिडकीतून हात आला, नंतर दरवाजा….; पुढे जे घडलं ते धक्कादायक! VIDEO व्हायरल

Viral Video: अनेकदा पालकांना कामामुळे मुलांना एकट घरी सोडून ऑफीसमध्ये जावं लागतं. पण कधी कोणती परिस्थिती ओढावू शकते, हे सांगू शकतं.अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मुलगी घरी एकटी असताना अचानक खिडकीतून एक हात आतमध्ये येतो.. पुढे जे घडलं ते फार भयानक होतं...

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 21, 2026 | 12:06 PM
घरात मुलगी एकटी असताना खिडकीतून हात आला, नंतर दरवाजा....; पुढे जे घडलं ते धक्कादायक! VIDEO व्हायरल

घरात मुलगी एकटी असताना खिडकीतून हात आला, नंतर दरवाजा....; पुढे जे घडलं ते धक्कादायक! VIDEO व्हायरल

Follow Us
Follow Us:
  • मुलगी घरात एकटी असताना घरात घुसण्याचा प्रयत्न
  • खिडकीतून हात घालणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल
  • घटनेचा व्हिडीओ पाहून पालकांच्या उडतील झोप
Viral Video: नोकरी करणाऱ्या पालकांसाठी कामावर जाताना मुलांना घरी एकटं सोडणं हा एक अत्यंत संवेदनशील आणि कठीण निर्णय असतो. आर्थिक गरजा आणि मुलांची रक्षितता या दोन्ही गोष्टींचा समतोल साधताना अनेक पालकांची मोठी तारेवरची कसरत असते. दरम्यान या संदर्भात एक व्हिडीओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये घरात एकटी असलेल्या मुलीच्या घरात घुसण्याचा प्रयत्न एक व्यक्ती करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या घटनेमुळे लहान मुलांना घरी एकटे सोडणे कितपत सुरक्षित आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेषतः कामानिमित्त घराबाहेर जाणाऱ्या पालकांसाठी हा व्हिडीओ चिंतेचा विषय ठरत आहे.(Viral Video)

खिडकीतून घरात शिरण्याचा प्रयत्न

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी घरात एकटी असल्याचे पाहायला मिळत आहे. याचवेळी घराबाहेर असलेली एक व्यक्ती खिडकी उघडण्याचा प्रयत्न करतो. खिडकी उघडल्यानंतर संबंधित व्यक्ती घरात हात घालण्याचा प्रयत्न करते. मात्र, हे लक्षात येताच मुलगी प्रसंगावधान राखत खिडकी बंद करते.

Famous Hippo Dies : धक्कादायक! विणलेली टोपी गिळली अन् जगप्रसिद्ध पाणघोडी फिओनाचा मृत्यू

विशेष म्हणजे, खिडकी बंद केल्यानंतरही संबंधित व्यक्तीचा प्रयत्न थांबत नाही. तो आपल्या साथीदारासह घराच्या दरवाजाजवळ जातो आणि जोरजोरात दरवाजा ठोठावू लागतो. या प्रसंगात मुलगी घाबरून न जाता तातडीने आपल्या परिचितांना फोन करते आणि घडलेल्या प्रकाराची माहिती देते. मुलीने फोन केल्यानंतर संबंधित व्यक्ती तेथून पळून गेल्याचे व्हिडीओमध्ये दिसते.

क्या बेटी को घर पर अकेले रहना चाहिए? 😱 क्योंकि कुछ असामाजिक तत्व घरों के आसपास घूमते रहते है https://t.co/EKU4vFRCih — Sunil Bishnoi 🇮🇳 (@MSunilBishnoi) November 20, 2026

सोशल मीडियावर मुलीच्या प्रसंगावधानाचे कौतुक

हा व्हिडीओ सुनील बिश्नोई नावाच्या युजरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘आपण आपल्या मुलीला घरात एकटे सोडावे का?’ असा प्रश्न त्यांनी व्हिडीओच्या कॅप्शनमधून उपस्थित केला आहे. घराच्या आसपास अशा समाजकंटकांचा वावर असू शकतो, त्यामुळे पालकांनी मुलांच्या सुरक्षेबाबत सतर्क राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सूचित केले आहे.

व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक सोशल मीडिया युजर्सनी मुलीच्या प्रसंगावधानाचे कौतुक केले आहे. तसेच घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. काही युजर्सनी मुलांना घरी एकटे सोडणे टाळावे, असे मत व्यक्त केले आहे.

पालकांनी कोणती काळजी घ्यावी?

– लहान मुलांना शक्यतो घरात एकटे सोडू नये.
– घराचे दरवाजे आणि खिडक्या व्यवस्थित बंद असल्याची खात्री करावी.
– अनोळखी व्यक्तींसाठी दरवाजा उघडू नये, हे मुलांना समजावून सांगावे.
– आपत्कालीन परिस्थितीत कोणाला फोन करायचा, याची माहिती द्यावी.
– घरात सीसीटीव्ही आणि सुरक्षित लॉकची व्यवस्था करावी.
या व्हिडीओमुळे मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मात्र, ही घटना नेमकी कुठे घडली आणि संबंधित व्यक्तीची ओळख काय आहे, याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही.

Indian Railway Theft : ट्रेनमध्ये चोरीचा प्रकार आणि अचानक झोपेचे नाटक! खिसेकापूचा VIDEO पाहून नेटकरी थक्क

💡

Frequently Asked Questions

  • Que: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काय दिसत आहे?

    Ans: व्हिडीओमध्ये घरात एकटी असलेल्या मुलीच्या घरात खिडकी उघडून शिरण्याचा प्रयत्न एक व्यक्ती करताना दिसत आहे.

  • Que: घरात एकटी असलेल्या मुलीने काय केले?

    Ans: मुलीने प्रसंगावधान राखत खिडकी बंद केली. त्यानंतर तिने परिचितांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.

  • Que: या व्हिडीओमधून पालकांना कोणता संदेश मिळतो?

    Ans: लहान मुलांना घरी एकटे सोडताना त्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. घराची सुरक्षा व्यवस्था मजबूत ठेवणे आणि आपत्कालीन परिस्थितीत कोणाशी संपर्क साधायचा, याची माहिती मुलांना देणे महत्त्वाचे आहे. 

Web Title: Viral video man tries to enter house while girl is home alone child safety sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 12:06 PM

Topics:  

  • viral video
  • women safety

संबंधित बातम्या

Peru Earthquake: तीन देश हादरले! पेरूमध्ये 6.7 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; इक्वेडोर आणि कोलंबियापर्यंत जाणवले धक्के, VIDEO VIRAL
1

Peru Earthquake: तीन देश हादरले! पेरूमध्ये 6.7 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; इक्वेडोर आणि कोलंबियापर्यंत जाणवले धक्के, VIDEO VIRAL

Indonesia : इंडोनेशियात भरधाव ट्रेनने मिनीबसला उडवले; चालक जिवंत जळाला, पण कसे वाचले 264 प्रवाशांचे प्राण? पहा VIRAL VIDEO
2

Indonesia : इंडोनेशियात भरधाव ट्रेनने मिनीबसला उडवले; चालक जिवंत जळाला, पण कसे वाचले 264 प्रवाशांचे प्राण? पहा VIRAL VIDEO

Famous Hippo Dies : धक्कादायक! विणलेली टोपी गिळली अन् जगप्रसिद्ध पाणघोडी फिओनाचा मृत्यू
3

Famous Hippo Dies : धक्कादायक! विणलेली टोपी गिळली अन् जगप्रसिद्ध पाणघोडी फिओनाचा मृत्यू

Indian Railway Theft : ट्रेनमध्ये चोरीचा प्रकार आणि अचानक झोपेचे नाटक! खिसेकापूचा VIDEO पाहून नेटकरी थक्क
4

Indian Railway Theft : ट्रेनमध्ये चोरीचा प्रकार आणि अचानक झोपेचे नाटक! खिसेकापूचा VIDEO पाहून नेटकरी थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.