Labubu doll in Indain saree and Tika video goes viral
Labubu Doll Video : सोशल मीडियावर रोज काही ना काही वेगळे ट्रेंड पाहायला मिळतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र प्रकारच्या गोष्टी सतत व्हायरल होत असतात. गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर लबूबू डॉल मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहे. ही बाहुले प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीकडे दिसत आहे. सध्या ही बाहुली तिच्या भयानक पण, डोंगस चेहऱ्याने संपूर्ण जगाला आकर्षित केले आहे. अगदी सामान्यांपासून सिलिब्रिटीलोकांपर्यंत ही बाहुल लोक खरेदी करताना दिसत आहेत. याची किंमत लाखोंमध्ये आहे.या भयानक दिसणाऱ्या बाहुलीने संपूर्ण जगाला भुरळ घातली आहे.
सध्या या भयावह बाहुलीचा सोशल मीडियावर एक मोठा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. यामध्ये या बाहुलीला साडी घातलेली. तिच्या कपाळावर टिळक लावलेले दिसत आहेत. तिने एक बिंदी घातली आहे. या बाहुलाला लबूबू भाभी म्हणून लोक म्हणत आहेत. सोनेरी आणि लाल रंगाची साडी या बुहालीने नेसलेली आहे. परंतु या रुपातही ही बाहुली अतिशय भयावह दिसत आहे. सध्या ही नव्या रुपातील बाहुली सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.
लबुबू ही केवळ एक बाहुली नाही तर एक काल्पनिक पात्र आहे. २०१५ मध्ये हाँगकाँगच्या कलाकार केसिंग लंग यांने “The Monsters” नावाच्या मालिकेसाठी ही बाहुली डिझाइन केली होती. Pop Mart ही चिनी कंपनी या बाहुल्यांचे उत्पादन करते. लबुबूची खास ओळख म्हणजे तिचे मोठे डोळे, टोकदार कान आणि नऊ दातांनी भरलेले खट्याळ हास्य आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @24thspoke या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने ‘भाभी मेरी भूतवर्गी’ अशी गाण्याची ओळ ठेवली आहे, तर दुसऱ्या एकाने ‘लबूबू भाभी’ असे म्हटले आहे. तिसऱ्या एका युजरने बाहुलीला नाव देत, ‘लबूबूप्रीत कौर’ असे म्हटले आहे. आणखी एका युजरने ‘हिचे तात्या विंचू सोबत लग्न लावून द्या’ असे म्हटले आहे. तर एका युजरने ‘बाहुलीचे लग्न पाहयचे’ असे म्हटले आहे. अशा भन्नाट प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.