भाषेचा वाद आता मुंबई लोकलपर्यंत; हिंदी भाषिक महिलांना मराठी महिलांनी भरला सज्जड दम, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यात मराठी भाषेवरुन मोठा वाद सुरु आहे. नुकेतच मुंबईच्या विक्रोळी परिसरातील एका दुकानदाराने मराठी भाषा आणि महाराष्ट्राबद्दल वादग्रस्त स्टेटस व्हॉट्सअपला ठेवले होते. यानंतर त्या व्यक्तीला मनसेच्या कार्यकर्त्यांकडून चोप देण्यात आला होता. याशिवाय अनेक वेळा बॅंक कर्मचारी, तसेच खाजगी कार्यालयातील लोकांच्या हिंदी बोलण्यावरुन देखील मोठा वाद पेटला होता. याचे अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते. सध्या असाच एक मुबंई लोकलमधील महिलांच्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मुंबई लोकलमध्ये सहसा जागेवरुन, धक्का-बुक्कीवरुन महिलांमध्ये वाद होतात. परंतु यावेळी हा वाद थेट भाषेवरुन झाला आहे. हा वाद मराठी विरुद्ध हिंदी सुरु आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिलांच्या डब्यामध्ये मराठी बोलण्यावरुन वाद सुरु आहे. काही महिला मराठी न बोलणाऱ्या लोकांना मराठीत बोला नाहीतर इथून निघून जा असे म्हणताना दिसत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात शिवीगाळही सुरु आहे. एक महिला हा आमचा महाराष्ट्र, इथे मराठीत बोला आणि बोलता येत नसेल तर बाहेर निघा असे म्हणताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. परंतु या वादाची सुरुवात नेमकी कशावरुन झाली हे लक्षात आलेले नाही. हा वाद सीटवरुन सुरु झाल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये महिलांचे दोन गट दिसत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
#FLASH: Marathi vs Hindi row reaches Mumbai local trains. A fight broke out among women in the ladies coach on Friday evening over speaking Marathi. Viral video shows a woman saying: “If you want to live in Mumbai, speak Marathi — or get out!” Incident happened in a Central… pic.twitter.com/YeaZ5Marnk — The New Indian (@TheNewIndian_in) July 20, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @TheNewIndian_in या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहे. अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी मराठी बोलणाऱ्यांना सपोर्ट केला आहे, तर काहींनी सीटवरील वाद नेमका मराठी पर्यंत कसा पोहोचला असा प्रश्न केला आहे. सध्या या व्हिडिओने सोशल मीडियावर मोठी धुमाकूळ घातली आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.