झाडावर बसून बिबट्या पाहत होता भक्ष्याची वाट, तितक्यात मगर आली; जबडा पकडला, किंचाळ्या ऐकू आल्या अन् चित्तथरारक Video Viral
जंगलात शिकारीच्या अनेक घटना नेहमीच घडून येत असतात. इथे जगायचं म्हटलं की शिकार यायलाच हवी. मोठे शिकारी नेहमीच लहान प्राण्यांची शिकार करतात पण शिकाऱ्यानेच दुसऱ्या शिकाऱ्याची शिकार केल्याचे तुम्ही कधी पाहिले आहे का? हे अनोखे दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे ज्यात एका बिबट्याने चक्क जंगलाचा वेगवान शिकारी मगरीची शिकार केल्याचे दिसून आले आहे. बिबट्या मगरीचा असा जबडा पकडते की जंगलाच्या शिकाऱ्याची किंचाळी बाहेर पडते. हे सर्व दृश्य लांबूनच काही पर्यटक आपल्या कॅमेरात कैद करतात आणि याचाच व्हिडिओ आता इंटरनेटवर व्हायरल होत आहे. चला व्हिडिओत काय घडलं ते जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
बिबट्या हा जंगलातील सर्वात चपळ आणि धोकादायक शिकारी मानला जातो, हा शक्तिशाली शिकारी क्षणार्धात आपली शिकार पकडतो. तर मगरही या यादीत काही मागे नाही, आपल्या धूर्तपणाने मगर पाण्यातच आपले राज्य उभारून बसली असते. पाण्यात तिचा हात कोणी पकडू शकत नाही पण आताच्या व्हिडिओत मात्र बिबट्याने पाण्याबाहेर मगरीची शिकार केल्याचे दृश्य दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये, एक बिबट्या भक्ष्याच्या शोधात झाडाच्या फांदीवर बसलेला दिसतो. काही वेळाने, खाली पाण्यात एक मगर दिसते. बिबट्या वेळ वाया न घालवता त्यावर झडप घालतो आणि काय होते ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते.
व्हिडिओमध्ये, बिबट्या मगरीला मानेने धरतो आणि त्याला ओढत झाडावर चढतो हे दिसून येते. हे दृश्य इतके विचित्र आणि अनोखे आहे की एका पर्यटकाने ते आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. बिबट्याला त्याच्या चपळतेमुळे आणि शांतपणे हल्ला करण्याच्या क्षमतेमुळे ‘सायलेंट किलर’ म्हटले जाते. बिबट्याची ही शिकार आता सर्वांनाच आश्चर्यचकित करत असून शिकारीचा हा व्हिडिओ आता इंटरनेटवर वेगाने शेअर केला जात आहे. व्हिडिओच्या शेवटी बिबट्या मगरीला खेचत खेचत जंगलात घेऊन जाताना दिसून येतो.
शिकारीचा हा व्हिडिओ @soraia_cozzarin नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “नक्की कोण कुणाला खात आहे मी हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जवळ उभे असलेले आणि रेकॉर्डिंग करणारे लोक धाडसी आहेत” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मला खरोखर जाणून घ्यायचे आहे की काय ओरडत आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.