(फोटो सौजन्य: X)
गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स यांनी बुधवारी ७ वर्षे जुन्या GST व्यवस्थेत काही मोठे आणि महत्त्वाचे बदल केले. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन दर २२ सप्टेंबरपासून लागू होतील. आता GST करात फक्त ५ आणि १८ टक्के असे दोन स्लॅब असतील. १२ आणि १८ टक्के स्लॅब पूर्णपणे रद्द करण्यात आले आहेत. आरोग्य आणि जीवन विम्यावरील GST पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.
तसेच, दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील GST देखील आता कमी करण्यात आला आहे. एवढंच काय तर ऑटोमोबाईल क्षेत्रातही GST करावर बदल करण्यात आले असून लहान कार, मोटारसायकल आणि स्कूटरवरील GST २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे. अशा सर्व वस्तूंवरील GST कमी झाला असला तरी मोठी वाहने आणि तंबाखूजन्य पदार्थांवर मात्र कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही ज्यामुळे आता सोशल मीडियावर मिम्सचा महापूर आला आहे. युजर्स GST सुधारणांवर नवनवीन मिम्स बनवून ते शेअर करत आहेत आणि हेच मिम्स आता इंटरनेटवर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. लोक हे मिम्स वाचत आहेत आणि शेअर देखील करत आहेत.
या मीममध्ये, युजरने दाखवले आहे की जर दारूवर ४०% जीएसटी लावला गेला तर दारू पिणाऱ्यांचे काय होईल. तथापि, हे लक्षात घेतले पाहिजे की दारू जीएसटीमध्ये समाविष्ट केलेली नाही. राज्ये त्यावर स्वतःचे कर आणि उत्पादन शुल्क लादतात. त्यामुळे, जीएसटीचा दारूवर मात्र थेट परिणाम होणार नाही.
Daaru par 40% GST hone ke baad
Daaru baaz :#GSTReforms pic.twitter.com/FhdBNUhLtH
— Raja Babu (@GaurangBhardwa1) September 3, 2025
सिन गुड्स आणि लग्झरी आयटम्सवर ४०% जीएसटी आकारण्यात येणार आहे. कार्बोनेटेड ड्रिंक्सवर आता २८% ऐवजी ४०% कर आकारला जाईल. तथापि, पान मसाल्यांवरील जीएसटी दरामध्ये आता वाढ करण्यात आली आहे.
आणखीन एका एक्स युजरने एक टेम्प्लेट शेअर केले आहे ज्यात लिहिले आहे की, आरोग्य आणि टर्म इन्शोरन्सवारील GST शून्य करण्यासाठी महिने आणि वर्षे लढणारी ट्विटर टोळी. आज त्यांचा आनंद साजरा करण्याचा दिवस आहे.
Twitter gang who fought for months & years to make GST 0 on Health & Term Insurances…
Today is the day to celebrate. pic.twitter.com/hNxXFul8nn— Kiran Rajput (@_KiranRajput) September 3, 2025
GST मध्ये केलेल्या नवीन बदलांसाठी युजर्स देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे कौतुक करत आहेत. या मीममध्ये, वापरकर्त्याने अर्थमंत्र्यांच्या व्हिडिओखाली लिहिले आहे की ‘जीएसटी रिफॉर्म करून द्वेष करणाऱ्यांना हेटर्सना फॅन बनवण्याचा मला अभिमान आहे.’ असे मिश्किल लिहिण्यात आले आहे.
#GSTReforms
🗿 pic.twitter.com/Z9J7aWOk0X— केw-प्रिnce (@K_prince_w) September 3, 2025
या मीममध्ये, युजरने एका व्यक्तीला किराणा दुकानात उभे राहून पान मसाल्याची किंमत विचारताना दाखवले आहे. हे मीम खूप व्हायरल देखील होत आहे. कारण यात व्यक्ती १० रुपयांचा घुटखा कितीला देणार असा प्रश्न करत आहे…
Gutkha lover after 40%gst 😭🤣#GSTReform #GSTCouncil pic.twitter.com/S6eNM7eIy0
— Marwadi bhau (@be_marwadii) September 4, 2025
या मीममध्ये, वापरकर्त्याने अर्थमंत्र्यांचा फोटो पोस्ट केला आहे आणि लिहिले आहे की, ‘माझे सर्वसामान्यांशी कोणतेही वैर नाही, पण जे गुटखा आणि पान मसाला खातात, त्यांना सोडले जाणार नाही.’
Nirmala Tai new GST introduce karte waqt #GSTCouncil #GSTReform pic.twitter.com/300icvZ5ME
— 🅰️ J (@EHuman0) September 4, 2025
जीएसटी सुधारणांमध्ये शिक्षण क्षेत्रालाही मोठा दिलासा मिळाला आहे, त्यामुळे आता स्टेशनरीवर कोणताही कर लागणार नाही. या संदर्भात, मीममध्ये ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील गोकुळधामच्या टप्पू सेनेला आनंद साजरा करताना दाखवण्यात आले आहे.
Indian kids after 0% GST on stationary items #GSTReform #GSTCouncilMeeting pic.twitter.com/AatYU0ugxa
— Marwadi bhau (@be_marwadii) September 4, 2025
दरम्यान GST व्हायरल मीम्स हे फक्त मनोरंजन नसून लोकांच्या भावना, नाराजी आणि विचार व्यक्त करणारे साधन आहेत. हसवत-खेळवत गंभीर मुद्द्यांवर विचार करायला लावणारा हा एक विनोदी आरसा आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.