जीवाचा थरार! कारमधून उतरत नवऱ्याशी वाद घालत होती पत्नी, तेवढ्यात वाघाने नेले खेचून... भयानक दृश्ये पाहून हादराल; Video Viral
सोशल मीडियावर अनेक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत असतात. इंटरनेटवर व्हायरल होणारे हे व्हिडिओज अनेकदा आपल्याला थक्क करून सोडतात. यात बऱ्याचदा अशी काही दृश्ये दाखवली जातात ज्यांचा आपण कधी स्वप्नातही विचार केला नसेल. आताही इथे जंगलातील एक हैराण करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्ये तुमच्या अंगावर काटा आणतील. यात सिंहाचे एका महिलेला खेचून नेल्याचे दिसून आले.
हा व्हिडिओ एका महिलेचा आणि सिंहाचा आहे. यामध्ये एक महिला आपल्या पतीशी वाद घालण्यासाठी जंगलात कारमधून उतरते आणि त्यादरम्यान ती एका भयंकर अपघाताचा बळी ठरते. कारमधून खाली उतरताच महिलेने पतीसोबत वाद घालण्यास सुरुवात केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तेवढ्यात अचानक एक सिंह जंगलातून बाहेर येतो आणि महिलेवर हल्ला करतो आणि तिला जंगलात घेऊन जातो. या व्हिडीओमध्ये दिसणारे दृश्य केवळ भितीदायकच नाही तर जंगलाजवळ जाण्यापूर्वी सावधगिरी बाळगण्याचा इशाराही आहे.
घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे, जे वेगाने व्हायरल होत आहे. यात महिलेने तिची कार थांबवली आणि पतीसोबत रागाने वाद घालण्यास सुरुवात केल्याचे दिसून येते. ती आणखी काही करण्याआधीच एका सिंहाने अचानक जंगलातून बाहेर पडून महिलेला पकडून जमिनीवर फेकले. पतीला आपल्या पत्नीला वाचवण्याची संधी मिळत नाही, कारण सिंहाने त्याला इतक्या वेगाने तिला खेचून नेले की तो काही करण्याआधीच ती जंगलात विलीन होऊन जाते. यानंतर आपण पतीला जंगलाच्या दिशेने पाळताना पाहू शकतो. ही घटना कधीची आणि नेमकी कुठली आहे याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
Woman gets out of the car to argue with her husband while inside a Tiger Safari 😳 pic.twitter.com/46HI74qhZj
— Crazy Clips (@crazyclipsonly) April 27, 2023
या थरारक घटनेचा व्हिडिओ @crazyclipsonly नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘टायगर सफारीमध्ये असताना पतीशी वाद घालण्यासाठी महिला गाडीतून उतरली’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत 20 मिलियनहुन अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्समध्ये यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ती पुन्हा नक्कीच असं करणार नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ओएमजी, त्याने तिला खेंण्यासारखे पकडले”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.