
म्हशींच्या कळपात सिंहाने टाकला डाका! धावत पळत पकडली मान, जमिनीवर लोळवत केली शिकार; थरारक Video Viral
जंगलात शिकारीचे अनेक दृश्ये नेहमीच रंगत असतात. मोठे शिकारी लहान शिकाऱ्यांची शिकार करुन जंगलात आपलं वर्चस्व गाजवतात आणि हाच जंगलाचा नियम आहे. इथे ज्याची ताकद जास्त, सत्ता त्याच्या हातात… अशात सिंह हा जंगलातील सर्वात धोकादायक शिकारींपैकी एक आहे, त्याची एक डर्काळी संपूर्ण जंगल हादरवून सोडते. सिंहाच्या वाटेला जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं आणि म्हणूनच कुणीही त्याच्या वाटेला जाऊ पाहत नाहीय परंतु सिंहच जर तुमच्या वाटेत आडवा आला तर काय होणार… म्हशींच्या कळपासोबत अशीच घटना घडून बसली, ज्यात एका सिंहाने अचानक त्यांच्या कळपावर आक्रमण केलं. म्हशींनी त्याच्यापसून आपला पळ काढला खरा पण एक म्हैस यात वाईटरित्या अडकली गेली. व्हिडिओत काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.
ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रकला धडकली Thar, तितक्यात समोरून आला दुसरा ट्रक अन् जे घडलं… Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
जंगलात, सर्वात मोठे शहाणपण म्हणजे शक्ती, संयम आणि वेळेचा समजूतदारपणा. गवताळ प्रदेशात पसरलेली शांतता अचानक भंग पावते जेव्हा ‘जंगलाचा राजा’ त्याची उपस्थिती जाणवते. सिंहाचे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचललेले दिसते… घाई नाही, चूक नाही. सिंहाच्या हिंसक शिकारीचा नवा व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे ज्यात सिंहाने आपले राजेशाही थाट दाखवत म्हशींच्या कळपाला घाबरवून सोडले. व्हिडिओमध्ये दिसते की, म्हशींचा एक कळप चरत असताना एका सिंहाने अचानक तिथे एंट्री घेतली. यामुळे संपूर्ण कळप घाबरला आणि एका दिशेने पळून गेला. सफारीचा आनंद घेत असलेले पर्यटक आणि छायाचित्रकारांनी हा दुर्मिळ क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला असे वाटत होते की सर्व म्हशी पळून जातील, परंतु “जंगलाच्या राजा” ने आधीच ठरवले होते की त्याला कोणत्या म्हशीला लक्ष्य करायचे आहे. सुमारे दीड मिनिटांच्या संघर्षानंतर, तो त्याच्या शिकारला त्याचे अन्न बनवण्यात यशस्वी झाला. कळपातील एका म्हशीला बाजूला घेत त्याने जमिनीवर खिळवले आणि काही क्षणातच तिला आपले जेवणाच्या ताटात सजवून ठेवले. सिंहाच्या तावडीतून कोणताही शिकार आपली सुटका करुन घेऊ शकत नाही हे पुन्हा या व्हिडिओतून सिद्ध झाले.
Lion hunting buffalo pic.twitter.com/hcGi6bYO5k — Damn Nature You Scary (@AmazingSights) October 29, 2025
शिकारीचा हा व्हिडिओ @AmazingSights नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “निसर्गाचे वास्तव जे शाकाहारी लोक जाणूनबुजून काय दुर्लक्ष करतात” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला माहित आहे की हे निसर्गाचे चक्र आहे, पण म्हशीला असं हळूहळू गुदमरून मरत असल्याचे पाहून मला वाईट वाटते.” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “म्हणून तो आहे जंगलाचा राजा”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.