(फोटो सौजन्य: Instagram)
घुबड हा प्राणी रात्रीच्या अंधारात जास्त सक्रिय होतो हेच कारण आहे की दिवसाच्या प्रकाशात तो फार कमी दिसून येतो. आता जिथे घुबडच दिसत नाही तिथे त्याच्या आयुष्यातील गोड क्षण तरी आपल्या डोळ्यासमोर कसे पडणार… पण नुकताच सोशल मीडियावर एक अनोखा आणि सर्वांचे लक्ष वेधून घेणारा दुर्लभ व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये एका झाडावर घुबडाच एक जोडपं रोमँटिक अंदाजात एकमेकांवर प्रेम लुटवताना दिसून आले. त्यांचा हा प्रेमळ अंदाज युजर्सना इतका भावला की काही क्षणातच व्हिडिओला करोडो व्युज मिळले. चला व्हिडिओत काय दिसलं याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
जर घुबडाचे वैयक्तिक आयुष्य गुप्तपणे कॅमेऱ्यात कैद केले असून याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. वाइल्डलाइफ फोटोग्राफर आरजू खुराणा हिने हे दृश्य आपल्या कॅमेरात कैद केले आहे. एका झाडावर दोन घुबड बसलेले असतात, ते दोघेही एकत्र इतके गोंडस दिसतात की तिने त्यांना तिच्या कॅमेऱ्यात त्यांचे हे दृश्य साठवू पाहिले. दोघेही व्हिडिओमध्ये एकमेकांना मिठी मारताना आणि प्रेमाने एकमेकांना गोंजारताना दिसून आले. घुबडांच्या जांभईपासून ते त्यांच्या रोमँटिक क्षणापर्यंत, या १५ सेकंदांच्या क्लिपमध्ये सर्वकाही कैद झाले आहे. लोकांना हा व्हिडिओ इतका आवडला की त्यांनी लगेच त्याला शेअर करायला सुरुवात केली आणि हेच कारण आहे की कमी वेळात हा व्हिडिओ व्हायरल झाला.
हा व्हायरल व्हिडिओ @aarzoo_khurana नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आजची इंटरनेटवरील सर्वात गोंडस गोष्ट’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “घुबडांमध्येही प्रेम असते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मी आतापर्यंत पाहिलेली सर्वात गोड गोष्ट” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे खूप आवडले! प्रेम ही सर्व प्राण्यांसाठी सामान्य असलेली एकमेव सामान्य भाषा आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






