अगं बाईईई! खेळताना दोन वर्षांचा चिमुकला थेट तांब्याच्या कळशीतच जाऊन अडकला; बाहेर काढताना सर्वांनाच फुटका घाम; Video Viral
सोशल मीडियावर अनेक मनोरंजक घटना आणि व्हिडिओज शेअर केले जातात. आता मात्र इथे एक धक्कादायक पण तितकाच मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात चिमुकल्याचा एक अनोखा पराक्रम दिसून आला. लहान मुलं खेळताना अनेक खोडी करतात, त्यांच्यावर लक्ष ठेवले नाही तर त्यांचे हे पराक्रम बरेच महागात पडू शकतात. असाच काहीसा प्रकार सध्याच्या व्हायरल व्हिडिओमध्ये घडून आल्याचे दिसून आले. दोन वर्षांचा चिमुकला खेळता खेळता चक्क तांब्याच्या कळशीमध्ये जाऊन अडकला. व्हिडिओमध्ये मुलाचे अर्धे शरीर कळशीच्या बाहेर तर अर्धे शरीर कळशीच्या आत अडकल्याचे दिसून आले. चला पुढे काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे प्रकरण?
चिमुकला नेहमीप्रमाणे आपल्या घरात खेळत होता. यावेळी त्याच्या घरचे इतर सदस्यही त्याच्या आसपास होते मात्र थोड्या वेळासाठी घरच्यांचे चिमुकल्यावरून लक्ष हटले आणि चिमुकला थेट कळशीतच जाऊन अडकला. तो यात कसा गेला हे कुणालाही ठाऊक नाही. जेव्हा त्याने रडायला सुरुवात केली तेव्हा सर्वांनां तो कळशीत अडकल्याचे समजले आणि सर्वांचे लक्ष मुलाकडे वळले. चिमूलकल्याला असे कळशीत अडकल्याचे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आणि संपूर्ण घरभर एकच गोंधळ उडाला.
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एक चिमुकला तांब्याच्या कळशीत अडकल्याचे दिसून येत आहे. त्याच्या आजूबाजूला अनेक मोठी माणसं त्याचा हा पराक्रम पाहत असतात आणि त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओत दिसते. चिमुकलीला शांत कलशात बसला असून त्याच्या चेहऱ्यावर चिंता आणि भीती साफ दिसून येते. अनेक प्रयत्न केल्यांनतर अखेर चिमुकल्याला बाहेर काढण्यात येते, हे सर्व दृश्य कॅमेरात कैद केले जाते आणि याचाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोक यातील दृश्य पाहून हादरली आहेत तर काही चिमुकल्याच्या खोडकरपणावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
व्हिडिओला अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर शेअर करण्यात आले असून लोक यावर आपल्या कमेंट्स करत घटनेवर आपले मत वय व्यक्त करत आहेत. व्हिडिओला चांगलेच शेअर देखील करण्यात येत आहे. एका युजरने लिहिले आहे, “आजकालची मुले खूप खोडकर आहेत, ते काहीही करतात” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जपुन काढा बाहेर बाळ बिनधास्त आहे. माणसं लावलीत कामाला..” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “लहानपणी मी सुद्धा असाच अडकलो होतो”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.