(फोटो सौजन्य: X)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज पाहिले आणि शेअर केले जातात. हे व्हिडिओ कधी आपल्याला हसवतात कधी रडवतात तर कधी भावूक करून जातात. अशातच आता असाच एक भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे जो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. वास्तविक, काल ईद अल अधा म्हणजेच बकरी ईद होता, त्यानिमित्त सर्वत्र बकऱ्यांची खरेदी विक्री सुरु होती अशातच एका बकऱ्याचा व्हिडिओ समोर आला आहे ज्यात तो ढसाढसा रडताना दिसून आला. मुक्या प्राण्याचा हा आक्रोश इतका भावनिक होता की ज्याने तो व्हिडिओ पाहिला त्याच्या डोळ्यात अश्रूच्या धारा वाहिल्या. चला व्हिडिओत नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडले व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, यात एक मालक आपल्या बकरीला विकत असल्याचे दिसून येत आहे. मालकाने लहानपानापासून या बकरीला वाढवलेले असते अशात हा निरोप दोघांसाठीही फार कठीण होता. व्हिडिओमध्ये निरोप देताना बकरी अक्षरशः मालकाला मिठी मारत रडताना दिसून येते तिचा हा आक्रोश पाहून सर्वच भावुक होतात. केवळ बकरीच नाही तर मालकालाही बकरीपासून वेगळे होणे फार जड जात असते, व्हिडिओत मालकही भावुक झाल्याचे आपल्याला दिसून येते.
हा व्हिडिओ बकरी ईदच्या काळातील असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये केलेल्या दाव्यानुसार, मालक बाजारात त्याची बकरी विकण्यासाठी गेला होता. मालकाने बकरीला विकतच आपण पुन्हा कधीही भेटू शकणार नाही हे प्राण्याला समजते. यानंतर, तो आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि मालकाला मिठी मारताना रडू लागतो. व्हिडिओमध्ये, तुम्हाला बकरीचा आवाज देखील ऐकू येतो, जो कुणालाही इमोशनल करून जाईल.
Goat brought to be sold hugs owner, cries like human 💔😭 pic.twitter.com/k5LwYRKDqW
— Raam (@Ram_Vegan) July 15, 2022
हा व्हायरल व्हिडिओ @Ram_Vegan नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘विकायला आणलेली बकरी मालकाला मिठी मारते, माणसासारखी रडते’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांपर्यंत पोहचला असून अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “अश्रू…तुम्ही तरीही त्याला विकलेस का? मला आशा आहे की नाही..” दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आम्हाला माफ करा. मानवजात अपयशी ठरली आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.