चिमुकलीने सापाला दाखवला इंगा, ओढून बाहेर काढले अन्... मुलीचे धाडस पाहून आवाक् व्हाल, पाहा Viral Video
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडिओज आपल्याला पोट धरून हसवतात तर काही आपल्याला थक्क करून जातात . सध्या असाच एक थक्क करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठया वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील दृश्य पाहून तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. व्हिडिओत एका चिमुकलीने पकडून अक्षरशः बाहेर ओढत काढल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओ पाहूनच तुमच्या अंगावर काटा येईल.
साप हा एक असा प्राणी आहे ज्याला फक्त प्राणीच नाही तर माणसंही फार घाबरतात. याला दुरून पाहताच अनेकांची पळताभुई एक होऊ लागते. सापाचे विष फार धोकादायक असते. त्याने एक डंक जरी मारला तरी त्याक्षणी माणूस मृत्यूच्या दारात पोहचू शकतो. सापाची दहशत तुम्ही अनेक व्हिडिओतून पहिली असेल मात्र सध्या सपालाच इंगा दाखवणाऱ्या एका चिमुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून आता अनेकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे.
हेदेखील वाचा – महाकाय अजगर आणि मगरीमध्ये रंगली भयानक लढत, जबड्यात पकडून गरागरा फरवले अन्… थरारक Video Viral
व्हायरल व्हिडीओत आपण पाहू शकतो की एका घरात अचानक साप शिरला आहे. एका टेबलाच्या मागे तो साप लपला असताना चिमुकली त्या सापाला धरून बाहेर काढण्याचा आणि खेचण्याचा प्रयत्न करतेय. सापाला बाहेर काढता काढता ती तिच्या आईलादेखील खूप हाका मारताना दिसत आहे. “अम्मी घर में साप घुस गया, अम्मी जल्दी आओ…” असं म्हणत ती त्या सापाला टेबलाखालून खेचून बाहेर काढते आणि घराच्या बाहेर नेते. हा व्हिडिओ व्हायरल होताच आता अनेकजण चिमुलीच्या धाडसाचे कौतुक करत आहेत.
हेदेखील वाचा – सीएमला पाहायला नाही तर मासे लुटायला आली होती लोकं, नितीश कुमारांच्या कार्यक्रमात माशांची लूट, Video Viral
हा व्हिडिओ @rahmanbhai786r नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमधील चिमुकलीचे धाडस पाहून आता अनेकजण हैराण झाले आहेत. तसेच अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “साप पण म्हणत असेल बहीण मला सोडून दे, मी पुन्हा इथे कधीच दिसणार नाही”, तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “साप बोलत असेल अम्मी मला तुझ्या मुलीपासून वाचवं”.