सोशल मीडियावर अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. यात अनेकदा काही प्राण्यांचे व्हिडिओदेखील सामील असतात. प्राण्यांच्या बऱ्याच गोष्टी आपण डोळ्यांनी पहिल्या नसल्याने अनेकांना असे प्राण्यांचे व्हिडिओज पाहायला फार मजा वाटते. यात बऱ्याचदा प्राण्यांमध्ये रंगलेल्या दमदार लढतीचेही काही व्हिडिओज समोर येत असतात. शक्तिशाली प्राणी दुसऱ्या प्राण्यांना कसे आपले शिकार बनवतात हे यात दाखवले जाते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात मगर आणि अजगरमधील थरारक लढत दाखवण्यात आली आहे. हा व्हिडिओ तुमच्या अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही.
अजगर आणि मगर हे दोन्हीही आपल्या ताकदीसाठी आणि शिकारीसाठी ओळखले जातात. मात्र हे दोन धूर्त शिकारी जेव्हा एकमेकांसमोर समोर येतात तेव्हा नक्की काय होते? हे या व्हिडिओत दाखवण्यात आले आहे. व्हिडिओच्या सुवातीलाच दोघांमध्ये घमासान लढत सुरु असल्याचे दिसून येत आहे. यात खरंतर, दोघेही एकमेकांवर भारी पडतात. त्यांच्यातील ही चित्तथरारक लढत पाहून त्यांच्या ताकदीची कल्पना करता येते.
हेदेखील वाचा – सौंदर्य बनले शाप! कोट्यवधी रुपये खर्च करून बनली सुंदरा मात्र आता होतोय पश्चाताप, म्हणाली, ‘सुंदर असल्यामुळे कधी कधी लोक…’
व्हिडिओमध्ये दिसते की, मगर हल्ला करत एका अजगराला आपल्या जबड्यात पकडून ठेवते, यानंतर ती अजगराला हवेत उचलते आणि गरगर फिरवत दूर फेकते. यावर प्रतिकार म्हणून अजगरही मगरीच्या तोंडाभोवती विळखा घालत तिला मारण्याचा प्रयत्न करतो, मात्र मगर तशी संधीच देत नाही. अजगर विळखा घालणार किंवा हल्ला करणार असे दिसताच मगर अजगराला जबड्यात घट्ट पकडून ठेवते आणि जोरजोरात फिरवते, पण तरीही अजगर हार मानत नाही आणि मगरीच्या तावडीतून स्वतःची सुटका करण्याचा वारंवार प्रयत्न करत राहतो.
Why is no one talking about the fact that they have a Crocodile and a Python fighting in their backyard 😳😳 pic.twitter.com/Vbrj4QhE59
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) September 18, 2024
हेदेखील वाचा – सीएमला पाहायला नाही तर मासे लुटायला आली होती लोकं, नितीश कुमारांच्या कार्यक्रमात माशांची लूट, Video Viral
आपल्या जबड्यात पकडून मगर अजगराला गरागरा फिरवते आणि अथक प्रयत्न करूनही अजगराला आपला जीव गमवावा लागतो. हा सर्व प्रकार आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. याचा व्हिडिओ @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी यावर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, या लढाईत कोण विजयी झाले? तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, मगरीने त्याला खाल्ले असावे.