
सर्वांना बाबा आहेत, पण तुम्ही दारु पिऊन गेलात... विडिलांच्या फोटोसमोर मुलीने व्यक्त केली खंत, यूजर्सही झाले भावूक; Video Viral
काय दिसलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओ एका लहान मुलीचा आहे जी वडिलांच्या जाण्याचे दु:ख त्यांच्या फोटोसमोर व्यक्त करत असते. वडिलांच्या जाण्याने मुलगी फार दु:खी असते. इतरांना बाबा आहेत पण आपल्याला नाहीत ही भावना तिला मनातच खात असते ज्यामुळे वडिलांच्या फोटोसमोर जाऊन ती तक्रार करु लागते. व्हिडिओमध्ये दिसते की मुलगी वडिलांच्या फोटोसमोर उभी आहे आणि त्यांच्यासमोर ती काहीतरी बोलत आहे. चिमुकली म्हणते की, “प्रत्येकाला वडील असतात, आणि तुम्ही दारूने मेलात. आई तुम्हाला सांगायची, पण तुम्ही ऐकले नाही.” पुढे ती मुलगी विचारते, “तुम्ही हे का केले ते मला सांगा, नाहीतर मी तुमच्याशी संबंध तोडेन.”
या लहान क्लिपन आता इंटरनेटवर सर्वांना भावूक केलं आहे. मुलीच्या दोनच ओळीत तिच दु:ख लोकांना समजलं आणि तिच्या परिस्थितीवर लोकांना खंत व्यक्त करण्यास सुरुवात केली. व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून १ लाखाहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक्स दिले आहेत. याचा व्हिडिओ @is58163 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे की, ‘मला बाबा नाहीयेत’.
व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने शेअर केला जात असून व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी चिमुकलीच्या या दु:खावर आपले मत व्यक्त केले आहे. यात एका यूजरने म्हटले की, “ती लहान आहे, म्हणूनच ती स्वतःला व्यक्त करू शकते… काही दिवसांत ती हे करणंही थांबवेल आणि मनातल्या मनात काळजीत पडेल”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खूप दुःखद व्हिडिओ” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर एखाद्या दारुड्याने दारू प्यायली, तर त्याने स्वतःला दहा बुटांनी मारून घ्यावे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.