(फोटो सौजन्य: Instagram)
मुलाचे एक्स-रे रिपोर्ट्स पाहताच आईने एक व्हिडिओ तयार करत ही बाब उघडकीस आणली आणि पालकांना सतर्कतेचा इशारा दिला. तिने सांगितले की, वाढदिवसाच्या दिवशी तिच्या मुलाने नकळत केक खाताना लोखंडी तार गिळली पण प्रश्न असा की ही तार केकमध्ये आलीच कशी. आईने सांगितले की, मुलाच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबाने ‘बॉलिंग थीम’चा सुंदर केक ऑर्डर केला होता. या केकच्या सजावटीत काही लोखंडी तारांचा वापर करण्यात आला होता ज्याची माहिती बेकर्सकडून कुटुंबाला देण्यात आली नाही.
मुलाची प्रकृती ढासळल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. इथेच एक्स-रे रिपोर्ट्समधून उघड झाले की, मुलाने लोखंडी तार गिळली आहे. यानंतर लगेचच डाॅक्टरांनी मुलावर उपचार करायला सुरुवात केली ज्यात सुदैवाने कोणतीही शस्त्रक्रिया न करता नैसर्गिरित्या मुलाच्या शरीरातून या लोखंडी तारेचे तुकडे बाहेर निघाले. यासाठी सुमारे ४८ तास लागले, ज्यात कुटुंब मुलाच्या आरोग्याला घेऊन प्रचंड घाबरले होते. आपल्या या अनुभवावरुन आईने ,लोकांना आवाहान केले की, केक किंवा सजावटीच्या वस्तू खाण्यायोग्य आहेत की नाही याची आधीच चाैकशी करुन घ्या. अनेकदा केकमध्ये सजावटीसाठी लोखंडी तारा, टूथपिक, प्लास्टीक अशा गोष्टी वापरल्या जातात ज्या आपल्या आरोग्यासाठी घातक ठरु शकतात.
View this post on Instagram
महिलेचा हा व्हिडिओ @reyaanshandmama नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून अनेक यूजर्सने याच्या कमेंट सेक्शनमध्ये या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. यात एका यूजरने म्हटले की, “केक्सवर खूप जास्त रंगीत सजावट करण्याची काय गरज आहे? त्याऐवजी साधेपणा ठेवा आणि काही रंगीबेरंगी फळे (जसे की द्राक्षे) वापरा. दुकानदारांकडून अपेक्षा करण्यापेक्षा आपण स्वतःच आपल्या मुलांची काळजी घेतलेली बरी”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे बापरे… देवाचे आभार की तुझा मुलगा ठीक आहे” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “बापरे! सुदैवाने काही मोठी समस्या उद्भवली नाही. खूपच भीतीदायक होतं ते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






