Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: साडेसहा वर्षांत ७२० जणांचा मृत्यू, २,४०८ जखमी! आपत्कालीन दुर्घटनांचे सत्र, आरटीआयमधून धक्कादायक वास्तव झाले उघड

Mumbai News: आकडेवारीतील सर्वात चिंताजनक बाब म्हणजे समुद्र, नाले, नद्या, विहिरी, खाड्या आणि मॅनहोलमध्ये पडून एकूण ३२८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये २३७ पुरुष आणि ९१ महिलाचा समावेश आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 22, 2026 | 09:24 AM
साडेसहा वर्षांत ७२० जणांचा मृत्यू, २,४०८ जखमी! आपत्कालीन दुर्घटनांचे सत्र, आरटीआयमधून धक्कादायक वास्तव झाले उघड

साडेसहा वर्षांत ७२० जणांचा मृत्यू, २,४०८ जखमी! आपत्कालीन दुर्घटनांचे सत्र, आरटीआयमधून धक्कादायक वास्तव झाले उघड

Follow Us
Follow Us:

Mumbai News: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत नागरी सुरक्षिततेचे तीन-तेरा वाजल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. गेल्या साडेसहा वर्षांत म्हणजेच सन २०२० ते सप्टेंबर २०२६ शहरात घडलेल्या विविध आपत्कालीन दुर्घटनांमध्ये तब्बल ७२० निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून २,४०८ नागरिक जखमी झाले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मागवलेल्या माहितीतून ही धक्कादायक आकडेवारी उघडकीस आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे जनमाहिती अधिकारी सुनील जाधव यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत ही अधिकृत माहिती दिली आहे. या साडेसहा वर्षांत आग, इमारत कोसळणे, दरडी कोसळणे, उघडे मॅनहोल्स आणि पाण्यात बुडण्याच्या घटनांमुळे मुंबईकरांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.(फोटो सौजन्य – AI)

Mangal Prabhat Lodha: विद्यार्थ्यांनो, तुमच्या कल्पनांना मिळणार नवी दिशा! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’साठी…

इमारती कोसळणे आणि आगीच्या घटनांत सर्वाधिक बळी

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरात घर, भिंती आणि इमारतीचे भाग कोसळून सर्वाधिक जीवितहानी झाली आहे. या प्रकारात १७९ नागरिकांचा मृत्यू झाला असून ८६४ जण जखमी झाले. तर आग व शॉर्टसर्किटच्या घटनांमध्ये तब्बल १६८ निष्पाप जीवांचा होरपळून मृत्यू झाला असून १,०४८ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.

पाणी आणि उघडे मॅनहोल्स ठरत आहेत ‘जीवघेणे’

जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीतील सर्वात चिंताजनक बाब म्हणजे समुद्र, नाले, नद्या, विहिरी, खाड्या आणि मॅनहोलमध्ये पडून एकूण ३२८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये २३७ पुरुष आणि ९१ महिलाचा समावेश आहे.

NHM Permanent Order News: आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!; १८ हजार कंत्राटी कामगार, अधिकाऱ्यांची कायमस्वरूपी नियुक्ती

प्रतिबंधात्मक उपाय कधी होणार; सवाल उपस्थित

दुर्घटना घडल्यानंतर केवळ पंचनामे आणि आर्थिक मदत जाहीर करण्यापलीकडे महापालिका प्रशासन ठोस प्रतिबंधात्मक पावले उचलते का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर, आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी महापालिका आयुक्त आणि मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांना पत्र पाठवून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. शहरातील धोकादायक इमारतींचे ऑडिट, उघड्या मॅनहोल्सवर जाळ्या बसवणे आणि नागरी सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्याची मागणी जोर धरत आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mumbai news 720 deaths and 2 408 injuries in six and a half years a series of emergency accidents sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 09:24 AM

Topics:  

  • Accident Death
  • Mumbai News
  • Trending News

संबंधित बातम्या

Mangal Prabhat Lodha: विद्यार्थ्यांनो, तुमच्या कल्पनांना मिळणार नवी दिशा! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’साठी…
1

Mangal Prabhat Lodha: विद्यार्थ्यांनो, तुमच्या कल्पनांना मिळणार नवी दिशा! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’साठी…

जंगलात शिकारीला गेले, प्राण्याचे डोळे समजून साथीदारावर गोळी; मृतदेहावर परस्पर केले अंत्यसंस्कार
2

जंगलात शिकारीला गेले, प्राण्याचे डोळे समजून साथीदारावर गोळी; मृतदेहावर परस्पर केले अंत्यसंस्कार

मुंबईतील ८७ बेकऱ्यांवर कारवाईचा बडगा? लाकूड-कोळशाचा वापर बंद करण्यासाठी पालिका आक्रमक
3

मुंबईतील ८७ बेकऱ्यांवर कारवाईचा बडगा? लाकूड-कोळशाचा वापर बंद करण्यासाठी पालिका आक्रमक

कराडजवळ भीषण अपघात; दर्शन घेऊन परतले, पण घरी पोहोचलेच नाहीत,चौघांचा दुर्दैवी अंत
4

कराडजवळ भीषण अपघात; दर्शन घेऊन परतले, पण घरी पोहोचलेच नाहीत,चौघांचा दुर्दैवी अंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.