
मैत्रीला तोड नाही! ! आपल्या साथीदाराला वाचवण्यासाठी 'डॉग कॅचर'वर तुटून पडला श्वान; भावनिक Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
असं म्हणतात की, एकवेळ माणून विश्वासघात करेल पण कुत्रा आपला विश्वास कधीही तोडणार नाही. अधिकतर प्राणी हे आपल्या मालकाप्रती निष्ठावान असतात पण इथे तर श्वान आपल्या मैत्रीच्या नात्यालाही पूरेपूर निभावताना दिसला. व्हिडिओमध्ये आपल्याला रस्त्याच्या कडेला एक डाॅग कॅचर एका कुत्र्याला मोठ्या जाळ्यात यशस्वीपणे पकडून त्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. आपल्या मित्राला दूर कुठे तरी नेले जात आहे हे जेव्हा श्वान पाहतो तो संतापतो आणि मित्राला सोडवण्यासाठी तो मोठ्या धैर्याने डाॅग कॅचरवर हल्ला करतो. तो व्यक्तीवर भुंकतो, त्याच्या पायाचा चावा घेतो आणि त्याला तिथून निघून जाण्यास सांगतो. या दृष्यांसहच व्हिडिओचा शेवट इथेच होतो ज्यामुळे श्वानाला पथकाने मोकळे केले की ते त्याला सोबत घेऊन गेले ते अधिकृतरित्या स्पष्ट झाले नाही. व्हिडिओ मात्र इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.
हा व्हिडिओ @funny.sudha नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत असून अनेक यूजर्सने व्हिडिओतील दृष्यांवर आणि श्वानाच्या मैत्रीवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “कुत्रा व्यक्तीला म्हणाला असेल माझ्याशी पंगा घेतलास तर मी तुला माफ करेन; पण माझ्या भावाशी पंगा घेतलास, तर मी तुझे लचके तोडेन”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “यालाच म्हणतात भावांमधील प्रेम”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “भाईचारा ऑन टाॅप”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.