(फोटो सौजन्य: X)
अरे बापरे! ट्रेनच्या इंजिनला साडी बांधून महिला रुळावरच करू लागली डान्स; Video तुफान व्हायरल
घटनेचा व्हिडिओ व्हायरल
या घटनेचे फुटेज सोशल मिडियावर शेअर करण्यात आले असून यातील दृष्ये पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. व्हिडिओमध्ये क्लबच्या पार्किंगमध्ये महिलेवर अमानुष मारहाण करताना दिसून येत आहे. महिला विवस्त्र अवस्थेत जमिनीवर पडलेली असते आणि काही महिला तर काही पुरुष बाउंसर्स तिला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत असतात. सूत्रांनुसार, पीडितेला क्लबच्या चौथ्या मजल्यावरून खाली पार्किंग एरियापर्यंत फरफटत नेण्यात आले होते. दुसऱ्या व्हिडिओमध्ये, एक महिला त्याला उचलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे, त्यानंतर एक गाडी येते आणि ते दिसेनासे होतात.
Guwahati Nightclub Horror: Woman Stripped And Assaulted By Bouncers#Guwahatihttps://t.co/WRLSVY376V — Jaano Junction (@JaanoJunction) October 3, 2026
हरवलेली पत्नी समोर येताच पतीचे डोळे पाणावले; VIDEO पाहून नेटकऱ्यांच्याही डोळ्यांत अश्रू अनावर
सदर घटनेची दखल घेत गुवाहटी पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. या सखोल तपास पोलिस करत असून महिलेला इतक्या वाईटरित्या मारहाण नक्की का केली जात होती यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना पसरल्यानंतर नाईटक्लबची मोठी नाचक्की झाली आणि नंतर तिथे टाळ लावलेला पाहण्यात आला. क्लबच्या व्यवस्थापनातील कोणीही पुढे येऊन घटनेची माहिती देण्यास तयार नाही. दरम्यान या घटनेची पोस्ट @JaanoJunction नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आली आहे. ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत असून यूजर्सने कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “व्हिडिओ पाहून मन सुन्न झालं; संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पण तिने नक्की असं काय केलं की त्यांनी तिच्यासोबत इतकी वाईट कृत्य केलं”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “कारण काहीही असलं तर अशाप्रकारे महिलेला मारहाण करणे चुकीचे आहे”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.






