
बाई आहे की सैतान! लिफ्टमध्ये मोलकरणीने केली श्वानाची हत्या, पकडून असं आपटलं... पाहून सर्वांचे हृदय हेलावले; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी घडून आली. उत्तर बेंगळूरुच्या बागलूर भागात एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाने 4 वर्षांच्या पाळीव कुत्र्याची काळजी घेण्यासाठी पुष्पलता नावाच्या मोलकरणीला कामावर ठेवलं. तिचे मंथली वेतन 23,000 ठरवण्यात आले. व्हायरल होत असलेल्या या सीसीटिव्ही फुटेजमध्ये महिला लिफ्टमध्ये दोन कुत्र्यांसह प्रवेश करताना दिसून आली. पण लिफ्टचे दरवाजे बंद होताच ती कुत्र्यांकडे रागाट नजरेने बघू लागते आणि नंतर एका कुत्र्याचा पट्टा पकडून त्याला जोरदार जमिनीवर आदळते. लिफ्टचे दार उघडताच दुसरा कुत्रा पळत लिफ्टमधून बाहेर पडताना दिसतो तर पुष्पलता मृत श्वानाला जमिनीवर लोळवत त्याला बाहेर काढताना दिसते. हा सर्वच प्रकार अंगावर काटा आणणारा आहे. एका निष्पाप जीवाची अशी हत्या करणं कायदेशीर गुन्हा आहे. मृत्यूनंतर, मालकाने पुष्पलताला विचारपूस केली तेव्हा तिने याबद्दल तिला काहीही माहिती नसल्याचं सांगितलं. दरम्यान व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुष्पलता हिला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @tellychakkar नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अरे देवा, हे पाहून मला रडू आवरत नाहीये” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “दुसरा कुत्रा खूप मानसिक आघातग्रस्त आहे, अरे! आता आपण कोणावर विश्वास ठेवू शकतो?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे खूपच अमानुष आणि भयानक आहे!”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.