
Man eats lunch with squirrle
सध्या सोशल मीडियावर एक गोंडस असा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्याने सर्वांचे मन जिंकले आहे. सध्या हा व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तुम्ही शाळेत, कॉलेजमध्ये तुमच्या मित्र-मैत्रीणींसोबत, ऑफिसमध्ये तुमच्या सहकार्यांसोबत जेवणकरत असता. यावेळी मज्जा, मस्ती करत कोणी काय आणलंय, छान छान खाऊ काय आहे असे सगळे पाहात आनंदा जेवण करत असाल. सध्या सध्या सोशल मीडियावर ISSF शूटर देवांश बरुआ याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. देवांश एक शूटर खेळाडू असून प्रॅक्टिसनंतर तो जेवण करायला बसला होता. यावेळी त्याच्यापाशी एक खास अतिथी जेवायला आली होती. एक छोटीशी खारुताई त्याच्या डब्यापाशी उड्या मारताना तुम्ही व्हिडिओत पाहू शकता. देवाश डबा ओपन करत असताना ती डब्या उभी राहिली आहे. असे वाटत आहे ती डब्यात काय आणले आहे हे पाहतेय. ती इकडून तिकडून फिरताना तुम्ही पाहू शकता.
संतापजनक! कॅनडात भारतीय कामगारासोबत गैरवर्तन; वर्णावरुन शिवीगाळ केला अन्…, VIDEO VIRAL
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @devanshbarua7 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंक लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. एका युजरने कमेंट केली आहे की, ती खूपच उत्साही दिसत आहे, तर दुसऱ्या एका युजरने कूल यू गॉट यूअर ओन पोकेमॉन असे म्हटले आहे, तर तिसऱ्या युजरने डब्यात का. आहे, याची तिला खूपच उत्सुकता लागली आहे, असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हास्य उमटेल असे म्हटले आहे.
Viral News : ब्लाइंड डेटवर गेला, ४ तासांनी लग्न केलं अन्…; पठ्ठ्यासोबत पुढं जे घडलं भयंकर
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.