संतापजनक! कॅनडात भारतीय कामगारासोबत गैरवर्तन; वर्णभेदावरुन शिवीगाळ केला अन्..., VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
कॅनडाच्या ओकव्हिल येथे एका भारतीय कामगारासोबत घृणास्पद असे वंशवादी गैरवर्तन करण्यात आले आहे. यामुळे सध्या जगभरातील वर्णभेदावुन भारतीयांसोबत होणाऱ्या गैरवर्तनाच्या चर्चांणा उधाण आले आहे. हे दृश्य कॅनडातील मॅकडोनाल्डच्या आउटलेटमधील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. व्हिडिओमध्य एक व्यक्ती एका कामगाराला शिवीगाळ करत आहे. त्याने तुम्ही भारतीय आहात, तुम्हील तुमच्या देशात परत जा असे इंग्रजीत म्हटले आहे. त्याला एका महिलेने थांबवण्याचा प्रयत्नही केला होता, परंतु त्याने पुन्हा एकदा शिवीगाळ केला आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून भारतीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
Viral News : ब्लाइंड डेटवर गेला, ४ तासांनी लग्न केलं अन्…; पठ्ठ्यासोबत पुढं जे घडलं भयंकर
व्हायरल व्हिडिओ
Disgusting display of racism in Burlington, ON. Welcome 2 Canada. 🇨🇦 pic.twitter.com/1EKZzfA3Is — EconomicWoes 🤖 (@ManyBeenRinsed) October 26, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @ManyBeenRinsed या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. यावर लोकांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहे. एका युजरने, हे भयानक आहे, असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने त्यांना काही लाज वाटत नाही असे म्हटले आहे. तर तिसऱ्या एकाने भारतीयांसोबत अशा प्रकारच्या घटना घडणे थांबणार कधी? असा प्रश्न केला आहे. तर आणखी एकाने आमच्या भारतात कोणी आले तर आम्ही त्याला देव माणून त्याचे स्वागत करतो आणि हे लोक असा त्रास देतात., अशी प्रतिक्रिया दिली आहे. परदेशात भारतीयांसोबतच्या हत्येच्या, वंशावरुन मारहाणीच्या, शिवीगाळाच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे भारतीयांनी चिंता व्यक्त केली आहे. या घटनेवरुन पुन्हा एकदा परदेशात भारतीय सुरक्षित नसल्याचे स्पष्ट होते, असे लोकांचे म्हणणे आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






