(फोटो सौजन्य: Instagram)
कोण ठरलं विजयी?
लोक सहसा प्राण्यांपासून आपल्याला इजा होऊ नये म्हणून त्यांच्यापासून दूर पळतात तर इथे हा व्यक्ती मात्र बैलालाच चॅलेंज देऊन त्याच्यासोबत लढाई करु पाहत आहे. व्हिडिओमध्ये अर्धनग्न व्यक्ती आणि बैल एकमेकांना झुंज देताना दिसून येतात. व्यक्तीने बैलाची दोन्ही शिंगे हातात पकडली असून तो संपूर्ण शक्तीचा वापर करुन बैलाला हरवण्याचा प्रयत्न करत असतो. बैलही यात मागे राहत नाही आणि आपल्या ताकदीने जागेवरुन हलता हलत नाही. अखेर बैलाची मान झुकवत व्यक्ती काही पाऊले बैलाला मागे सारतो आणि इथेच व्हिडिओचा शेवट होतो. व्हिडिओच्या शेवटी लोक जमा होऊन हे दृष्य रंजकतेने पाहत असल्याचे दिसते तर काहीजण कॅमेरात हे दृष्य शूट करतानाही दिसतात. व्हिडिओवर यूजर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या असून काहींनी व्यक्तीच्या धाडसाचे काैतुक केले आहे तर काहींनी व्यक्तीच्या अंगात फारच मस्ती असल्याचे म्हटले आहे.
प्रेमापोटी त्याग केला! मुलाच्या मुंडन समारंभात महिलांसह संपूर्ण कुटुंबाने केलं टक्कल; Video Viral
दरम्यान हा व्हिडिओ @shaktiranjan.____.07 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “एक दिवस हा बिचारा बाहुबली मरणार” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “याच्या अंगात जरा जास्तच किडे आहेत” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “संपूर्ण जगात बैलांची झुंज फक्त भारतातच लढली जाते, त्यासाठी कोणतेही प्रशिक्षण दिले जात नाही, ज्याच्यात ताकद असते तोच लढतो”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






