Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झुमके चोरीचा आरोप, जमावाकडून तरुणाला मारहाण… कुशीतल्या चिमुकल्याला रडताना पाहून यूजर्स झाले भावूक; Video Viral

People Beat Theif : रेल्वे स्थानकावर चोरीच्या संशयावरून एका व्यक्तीला जमावाने पकडून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. वडिलांना मारहाण होत असल्याचे पाहून कुशीतल्या चिमुकल्याने हंबरडा फोडला अन् दृष्य पाहून यूजर्स भावूक झाले.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 02, 2026 | 02:32 PM
झुमके चोरीचा आरोप, जमावाकडून तरुणाला मारहाण... कुशीतल्या चिमुकल्याला रडताना पाहून यूजर्स झाले भावूक; Video Viral

झुमके चोरीचा आरोप, जमावाकडून तरुणाला मारहाण... कुशीतल्या चिमुकल्याला रडताना पाहून यूजर्स झाले भावूक; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • रेल्वे स्थानकावर चोरीच्या संशयावरून एका व्यक्तीला जमावाने रंगेहात पकडलं.
  • मारहाणीदरम्यान त्याचं कुटुंबही घटनास्थळी उपस्थित होतं, ज्यामुळे वातावरण भावूक झालं.
  • घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
चोरांचा सुळसुळात वाढला असून रेल्वेतही चोरीचे प्रकरण वाढू लागले आहे. अशाच एक चोराला ग्वालियरमध्ये रंगेहात पकडण्यात आलं. माहितीनुसार, ग्वालियर रेल्वे स्थानकावर एका चोराला महिलेचे दागिने चोरताना जमावाने पकडलं. यानंतर लोकांनी मिळून त्याच्यावर हल्ला केला आणि एखाद्या जनावराप्रमाणे त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. स्थानकावर अधिकतर लोक हे फक्त चोराला मारण्यासाठी जमले होते. काहींनी चोराचे कपडे पकडले तर काहींनी लाथांनी त्याला तुडवलं. यादरम्यान चोराचे कुटुंबही घटनेस्थळी उपस्थित होते. चिमुकल्याने वडिलांना मारहाण होताना पाहून रडायला सुरुवात केली आणि हे दृष्य पाहून यूजर्स भावूक झाले. चला घटनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

धक्कादायक! कोब्राने तोंडातून मृत नागीणीला काढलं बाहेर, रेस्क्यूदरम्यानचे दृष्य पाहून सर्पमित्रही चक्रावले; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

मिळालेल्या माहितीनुसार, ग्वालियर रेल्वे स्थानकावर चोर, त्याची पत्नी आणि त्यांचा लहान मुलगा असे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. यावेळीच चोराने एका महिलेचे सोन्याचे कानातले आणि काही सामान चोरण्याचा प्रयत्न केला. या चोरीदरम्यान काही प्रवाशांनी त्याला रंगेहात पकडलं आणि मग स्थानकावरच चोराला जबर मारहाण करण्यात आली. घटनास्थळी लोकांचा जमाव निर्माण झाला आणि प्रत्येकाने आपला राग बाहेर काढण्यासाठी हाती आलेल्या चोराला मारहाण करण्यास सुरुवात केली. एकाने त्याची पँट पकडली तर एक फिल्मी अंदाजात उड्या मारतच चोराला मारहाण करु लागला.

चिमुरड्याने केलं भावूक

या मारहाणीदरम्यानच काही वेळाने चोराची पत्नी लहान मुलाला घेऊन मध्यस्ती बनून आली. तिने जमावाला रोखण्याचा आणि पतीला मारहाण न करण्याची विनंती केली. चोराने आपल्या बाळाला कुशीत घेतले आणि लोकांजवळ आपल्या चुकीची माफी मागितली. लहान मूल मात्र हा सर्व गोंधळ पाहून खूप घाबरला आणि त्याने तिथेच रडायला सुरुवात केली. यानंतर लोकांनी आपली मारहाण थांबवली आणि चोराला GRP/RPF च्या ताब्यात दिले.

यूजर्सच्या प्रतिक्रिया

घटनेचा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की ‘एका महिलेचे सोन्याचे कानातले आणि मौल्यवान वस्तू चोरताना एक चोर पकडला गेला. गर्दीने त्याला पळून जाण्यापासून रोखले, त्याला थोडा मारहाण केली आणि त्यानंतर जीआरपी (GRP) किंवा आरपीएफ (RPF) च्या ताब्यात दिले’.

Gwalior Railway Station: Passenger thief caught stealing woman’s gold earrings & valuables Crowd stopped him fleeing, briefly beat him, then handed over to GRP/RPF. pic.twitter.com/GfqDJjGTUw — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) July 2, 2026

VIDEO: अरे बापरे! प्रपोज की शेवटची भेट? 1454 फूट उंचावर गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, रोमँटिक मोमेंटआधीच पोलिसांनी केली कारवाई

दरम्यान अनेक यूजर्सने या घटनेवर आपल्या संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. लोकांनी फक्त स्वत:च्या आनंदासाठी ही मारहाण केली असे काहींचे म्हणणे आहे तर चोरी केली मग मारहाण तर होणारचं असे काहींचे मत आहे. एका यूजरने म्हटले की, “साखळी चोरणाऱ्याला इतकी जबर मारहाण केली जाते, मग कोट्यवधींची चोरी करणाऱ्या आयएएस (IAS) अधिकारी आणि राजकारण्यांचे काय?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे खरोखरच खूप वेदनादायी आहे…लोक न्याय मिळवून देण्यासाठी नाही तर फक्त आपल्या मजेसाठी मारहाण करत होते”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “कॅमेरा दिसला की कोणालातरी पकडून आपली निराशा बाहेर काढता येईल असं प्रत्येकाला वाटतं; पण जेव्हा एखादी व्यक्ती खरोखरच दुसऱ्याचा जीव घेत असते, तेव्हा हे ‘शूर’ भित्रे लोक मध्ये पडायची हिंमतही करत नाहीत, कारण त्यांना माहित असतं की तिथे त्यांची चालणार नाही”.

टीप – हे व्हिडिओ, पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Man caught stealing gold earrings thrashed by mob at gwalior railway station video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 02:31 PM

Topics:  

  • Gwalior
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

५८ लाखांचं पॅकेज, घर-गाडी सगळं तरीही मुलगा मिळेना… चीनच्या ‘वधू बाजारात’ हंबरडा फोडून रडू लागली महिला; Video Viral
1

५८ लाखांचं पॅकेज, घर-गाडी सगळं तरीही मुलगा मिळेना… चीनच्या ‘वधू बाजारात’ हंबरडा फोडून रडू लागली महिला; Video Viral

कुकरच्या शिट्टीत लपवलं १ कोटींचं सोनं; दिल्ली विमानतळावर प्रवाशाचा भांडाफोड; Video Viral
2

कुकरच्या शिट्टीत लपवलं १ कोटींचं सोनं; दिल्ली विमानतळावर प्रवाशाचा भांडाफोड; Video Viral

गबरू जवानाचा माज उतरला, काकांशी पंजा लढवत होता… अखेर तरुणालाच फुटला घाम; मजेदार Video Viral
3

गबरू जवानाचा माज उतरला, काकांशी पंजा लढवत होता… अखेर तरुणालाच फुटला घाम; मजेदार Video Viral

नकाब घातला तर हेल्मेट का नाही? ट्रॅफिक पोलिसांनी तरुणींना शिकवला धडा; Video Viral
4

नकाब घातला तर हेल्मेट का नाही? ट्रॅफिक पोलिसांनी तरुणींना शिकवला धडा; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.