कुणाचं कधी काय होईल ते सांगता येत नाही! चालता चालताच व्यक्तीला आला हृदयविकाराचा झटका, जागीच गेला जीव; Video Viral
आजकाल अकाली मृत्यूचे प्रमाण फार वाढले आहे. दररोज यासंबंधीचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आयुष्यात पुढच्या क्षणी काय घडेल, याचा काहीच नेम नाही. क्षणात आनंद असेल, तर दुसऱ्याच क्षणात दु:खाचे मळभ पसरलेले असते. अगदी काही सेकंदांत माणूस या जगातून निघून जाईल, याची कुणालाही कल्पना नसते. अशीच एक घटना इंदौरमध्ये घडली आहे, जिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
काय आहे प्रकरण?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, यात एक व्यक्ती लाल रंगाचा शर्ट परिधान केला आहे, तो शांतपणे इमारतीच्या आवारात चालत होता. त्याच्या चालण्यात कुठलाही अस्वस्थपणा जाणवत नव्हता. पण काही क्षणात सगळं बदललं. अचानक तो खाली कोसळला, आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. हे दृश्य पाहून आजूबाजूचे लोक घाबरले आणि त्यांनी तात्काळ रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत सगळं संपलेलं होतं. त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता आणि यातच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. व्यक्तीचा मृत्यूचा हा थरार दुरूनच एका व्यक्तीने आपल्या कॅमेरात कैद केला आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर आता हा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. लोक यातील दृश्ये पाहून हादरले असून अनेकांनी याबाबत हळहळ व्यक्त केली आहे.
एक और चलते-फिरते अचानक मौत LIVE
मध्य प्रदेश के इंदौर में देखें कैसे हार्ट अटैक से एक और मौत हो गई । न जानें कितनी मौत हुई है पिछले कुछ सालों में लेकिन किसी के लिए अभी भी गंभीर मुद्दा नहीं है । कब चेतेंगे? pic.twitter.com/tqyTIbb5a8
— Narendra Nath Mishra (@iamnarendranath) April 17, 2025
या घटनेने अनेकांच्या मनात धक्का बसला. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर अनेकांनी यावर हळहळ व्यक्त केली. “शत्रूलाही असा मृत्यू येऊ नये,” अशा भावना लोक व्यक्त करत आहेत. आयुष्य किती क्षणभंगुर आहे, याची ही एक जाणीव करून देणारी घटना आहे. दरम्यान हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या प्रमुख धमन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास, हृदयापर्यंत ऑक्सिजन पोहोचत नाही. यामुळे हृदयाची कार्यक्षमता अचानक कमी होते आणि मग हृदयविकाराचा झटका येतो. हृदयविकाराचा धोका सध्या वेगाने वाढत आहे, त्यामुळे वेळोवेळी आपल्या आरोग्याची तपासणी करणे महत्त्वाचे आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही