(फोटो सौजन्य – X)
जंगलाच्या जगात, जीवन आणि मृत्यूचा खेळ दररोज सुरू असतो. याचे अनेक रोमांचक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत असतात. जंगलातील शिकारीचा हा थरार लोक आवडीने पाहतात आणि जंगलातील आयुष्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात सिंहाच्या एका गटाला म्हशींनी चांगलीच अद्दल घडवल्याचे दिसून येते. मुळातच एका म्हशीवर सिंहाच्या संपूर्ण गटाने हल्ला केला पण पुढच्याच क्षणी तिथे म्हशीच्या कळपाने एंट्री केली आणि सर्व खेळच पलटला. निसर्गाच्या या खेळात पुढे काय घडले ते चला सविस्तर जाणून घेऊया.
यमराजाला खुले आव्हान! व्यक्ती थेट विजेच्या खांब्यावर जाऊन झोपला; मग पुढे जे घडलं… Video Viral
म्हशीचा जीव धोक्यात असल्याचे दिसून येताच, तिच्या कळपातील इतर साथीदार घटनास्थळी धावले. म्हशींच्या या कळपाच्या अचानक आगमनाने वातावरण पूर्णपणे बदलून गेले. व्हिडिओमध्ये म्हशींनी एकत्र येऊन सिंहांवर हल्ला केल्याचे दिसून येते. त्याच्या शक्ती आणि धाडसापुढे सिंह असहाय्य होते. म्हशींनी त्यांच्या शिंगांचा आणि प्रचंड शरीराचा वापर करून सिंहांना पळवून लावण्यास सुरुवात केली. पूर्वी म्हशींना आपला शिकार मानणारे सिंह आता जीव वाचवण्यासाठी पळू लागले. म्हशींच्या कळपाने इतका आक्रमकपणा दाखवला की सिंहांना माघार घ्यावी लागली. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की सिंह एकामागून एक कसे पळून जातात आणि म्हशी त्यांचा पाठलाग करतात. हे दृश्य जंगलातील एकतेची शक्ती आणि म्हशींच्या धाडसाचे चित्रण करते. सोशल मीडियावरील लोक हा व्हिडिओ पाहून आश्चर्यचकित झाले आहेत आणि म्हशींच्या शौर्याचे कौतुक करत आहेत.
Make friends who are there in tough times
pic.twitter.com/b9afE3Om9L— Science girl (@gunsnrosesgirl3) April 16, 2025
जंगलातील हा व्हिडिओ @gunsnrosesgirl3 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘कठीण काळात साथ देणारे मित्र बनवा’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत 4 मिलियनहुन अधिकचे व्युज मिळाले असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “गरजेच्या वेळी मदत करणारा मित्र हा खरा मित्र असतो” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “म्हशी हुशार असत्या तर बरे झाले असते. त्यांना सिंहांना त्यांच्यापेक्षा अधिक प्रभावीपणे रोखता आले पाहिजे, पण बऱ्याचदा ते पळून जातात”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.