Man falls directly from roof on car but miracle happens video viral
सध्या सोशल मीडियावर अनेक भयावह अपघातांचे व्हिडिओ पाहायला मिळत आहे. पण काही अपघात असे घडले आहे की लोक हैराण झाले आहेत. असाच एक काळजात धडकी भरवणारा आणखी व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती छतावरुन थेट गाडीवर कोसळला आहे. पण त्याच्यासोबत असे काही घडले आहे की, अनेकजण हैराण झाले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका बिल्डींग बाहेर काही गाड्या पार्क केल्या आहेत. तसेच रस्त्यावर गाड्यांची येजा देखील सुरु आहे. याच वेळी अचानक एक व्यक्ती छतावरुन खाली कोसळतो. हा व्यक्ती थेट गाडीच्या बोनेटवर कोसळतो. यामुळे गाडीच्या बोनेटची काच फुटते आणि व्यक्ती आतमध्ये जातो.
पण त्यानंतर ही व्यक्ती त्यातून बाहेर येते आणि गाडीच्या बाजूला जाऊन उभी राहते. व्यक्ती अशी दिसत असते की जणू त्याच्यासोबत काही घडले नाही. हा व्हिडिओ एवढा भयावह आहे की एका क्षणासाठी तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. सुदैवाने त्या व्यक्तीला कोणतीही दुखापत झालेली नसते. ती व्यक्ती आसापस पाहत तिथून हळूच पळ काढते. पण हे दृश्य अगदी एखाद्या चित्रटासारखे होते. कार मालकाचे मात्र मोठे नुकसान झाल्याचे व्हिडिओ स्पष्ट कळते. शिवाय आसपासच्या लोकांना याचा सुगावाही लागत नाही की नेमकं काय घडलं आहे.
काळजात धडकी भरवणारा क्षण! अचानक भल्या मोठ्या ट्रकखाली आली तरुणी…; पुढे जे घडंल भयानक, Video Viral
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या या दृश्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @studio_n_media या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने यमराज सुट्टीवर होता वाटतं असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने बहुतेक यमराजने पृथ्वीवर परत पाठवले याला असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ कुठला आहे हे समजू शकलेले नाही, पण हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.