(फोटो सौजन्य: Instagram)
रामदेव बाबा हे भारतातील एक लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध योगगुरू आहेत. त्यांच्या लवचिक शरीराने ते कठीणातले कठीण योगा देखील सहज करू शकतात. रामदेव बाबांचे अनेक व्हिडिओज याआधीही इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत पण अलीकडे योगाचा एक अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात रामदेव बाबा नाही तर चक्क एक बकरी योगा करताना दिसून आली आहे. आता विचार करा एक बकरी जर योग करत असेल तर ते दृश्य कसं दिसेल… या अनोख्या योगासनाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून व्हिडिओत बकरीला योगा करताना पाहून युजर्स आता आश्चर्यचकित झाले आहेत. चला व्हिडिओत काय दिसलं ते जाणून घेऊया.
एक अनोखी स्पर्धा! साडी कमरेला खोचली अन् नवऱ्याला कडेवर घेऊन बायकोने घेतली धाव, मजेदार Video Viral
काय दिसलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओतील दृश्ये खरंतर काल्पनिक वाटू लागतात पण ती दृश्ये खरी आहेत. यात तुम्ही पाहू शकता की, एका खुल्या मैदानात एक महिला योगा मॅटवर योगा करत आहे. आपला योगा करून झाल्यानंतर ही महिला तिथून उठते पण आपला मॅट मात्र ती तिथेच ठेवते. यावेळी तुम्ही नीट पाहिलं तर तुम्हाला दिसेल की, एक पांढरी बकरी आपल्या मालकिणीला योगा करत असताना टकामका बघत असते, जेव्हा आपल्या मालकिणीचा योगा करून होतो तेव्हा बकरीला योगाचा मोह आवरत नाही आणि ती लगेचच मॅटवर बसून योगासने करायला सुरुवात करते. बकरी इतक्या छान प्रकारे योगा करते की पाहून सर्वांचे डोळे विस्फारून जातात. लोक कोड्यात पडतात की हे खरंच सत्यात घडतंय की हा फक्त नजरेचा भास आहे… हा व्हिडिओ नक्की कुठला आहे याची पुष्टी अद्याप झाली नाही पण सोशल मीडियावर मात्र हा व्हिडिओ जोरदार धुमाकूळ घालत आहे, लोक बकरीचा योगा पाहून ही तर फिटनेस फ्रिक बकरी आहे अशा मजेदार प्रतिक्रिया व्हिडिओला देत आहेत.
दरम्यान बकरीच्या योगासनाचा हा व्हिडिओ @unknown_cheeku_ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “बकरीला पण फिट राहायचं आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तिला बकरी समाजमध्ये इज्जत वाढवायही असेल ” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “किती गोड आहे हे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.