धक्कादायक! तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली, खाली पडताच लागला विजेचा झटका पण शेवटी जे घडलं... थरारक घटनेचा Video Viral
सोशल मीडियावर सध्या एक थरारक घटना व्हायरल झाली आहे ज्यातील दृश्ये तुमच्या अंगावर काटा आणतील. यात एका व्यक्तीने इमरतीच्या छतावरून उडी मारत आपले आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. ही घटना छत्तीसगडमधील दुर्गमध्ये घडली. मात्र गोष्ट इथेच थांबत नाही तर उडी मारताच तो एका हायव्होल्टेज विजेच्या तारेलाही आढळतो आणि त्याला जोरदार विजेचा झटका बसतो. तो विजेच्या खांबेवर आदळताच आगीच्या ठिणग्या उठतात. यानंतर तो खाली असलेल्या दुकानाच्या छतावर जोरात पडतो. हे संपूर्ण दृश्य फार धक्कादायक असून यांनतर पुढे जे घडते ते तर आणखीन आश्चर्यकारक आहे.
इमारतीच्या छतावरून पडून खाली विजेचा झटका लागून हा व्यक्ती खाली असेलल्या एका दुकानावर जाऊन पडतो. त्यानंतर तिथे लोकांची गर्दी जमते. लोकांना वाटले की त्याने आपला जीव गमावला आहे. त्यानंतर तो अचानक उभा राहिला आणि त्याने लोकांवर विटा फेकण्यास सुरुवात केली. हे पाहून लोकांनी आरडाओरडा सुरू केला. यावेळी पोलिसही उपस्थित होते.
या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एका व्यक्तीने इमारतीच्या छतावर एक लांब काठी धरली आहे आणि नंतर उडी मारली आहे. मात्र, ते जमिनीवर पडण्याऐवजी हाय-व्होल्टेज विजेच्या तारांवर आदळतो. यानंतर खाली असलेल्या गर्दीत आरडाओरडा सुरू आहे. विजेचा शॉक लागल्यानंतर तो पहिल्या मजल्यावरच्या बाल्कनीत पडला. सुरुवातीला तो मेला असे वाटत होते, पण अचानक तो उभा राहतो आणि पोलिसांच्या पथकावर विटा फेकण्यास सुरुवात करतो. ही संपूर्ण घटना छत्तीसगढमध्ये घडल्याचे समजत आहे.
“Superhuman – The Real Wolverine”
In Durg, Chhattisgarh : Man jumps from 3rd floor, gets Electrocuted and entangled in electric wires, passes out and then falls and then miraculously gets up to throw bricks at police.
Hollywood – 0
Desi-Wood – 1 pic.twitter.com/FzIJ3Fba5J— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) February 23, 2025
AI रोबोटला राग झाला अनावर, गर्दीत शिरून महिलेला केली मारहाण, पाहून तुम्हीही दंग व्हाल; Video Viral
या आश्चर्यकारक घटनेचा व्हिडिओ @MeghUpdates नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओतील दृश्ये आता अनेकांना धक्का देत असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे कोणत्या ॲक्शन चित्रपटातील दृश्ये वाटत आहे, तिसऱ्या मजल्यावरून उडी मारतो, विजेचा धक्का लागतो, बाहेर पडतो, पडतो—मग उठतो आणि पोलिसांवर विटा फेकायला लागतो” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तिथे खूप लोक आहेत, पोलीसही आहेत मग त्याला उडी मारण्यापासून का थांबवले नाही?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.