(फोटो सौजन्य: Twitter)
आपल्या मुलांना जन्म देण्यासाठी आईला अनेक कष्ट घ्यावे लागतात. आपल्या जीवनातील आईचे महत्त्व आहे अनन्यसाधारण आहे. आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी कोणताही थराला जाणाऱ्या आईची तुलना कोणत्याही गोष्टी सोबत होऊ शकत नाही. मात्र हीच मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा आपल्या आईवडिलांच्या कष्टाला विसरून जातात. आजकाल तर मुलं त्यांना मारायलाही मागेपुढे बघत नाही. अशीच एक घटना नुकतीच सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे ज्यात एक मुलगी आपल्या जन्मदात्या आईलाच मारहाण करताना दिसून आली. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांचे हृदय हेलावले आहे आणि मुलीच्या क्रूरतेवर लोक संतापाने भरले. यात नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आई आणि मुलगी बेडवर बसलेले दिसत आहे. आईच्या डोळ्यात अश्रू आहेत, ती वेदनेने रडत आहे, पण मुलीला तिची कीव येत नाही. मुलगी केवळ आईला मारहाण करत नाही तर क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडून तिच्या पायाचा चावा देखील घेते. आई ओरडून स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करते, पण त्याचा तिच्या मुलीवर काहीही परिणाम होत नाही. ती सतत आईला त्रास देत असते.
AI रोबोटला राग झाला अनावर, गर्दीत शिरून महिलेला केली मारहाण, पाहून तुम्हीही दंग व्हाल; Video Viral
व्हिडीओमध्ये पुढे दिसून आले आहे की, आई बेडवरून उतरून स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करते तरीही मुलीचे क्रूर वागणे संपत नाही. ती तिच्या आईला मागून मारहाण करते आणि नंतर आई स्वतःला वाचवण्यासाठी तिच्या मागे जाते. ही संपूर्ण घटना हृदय पिळवटून टाकणारी असून आई-मुलीच्या नात्याला लाजवेल अशी आहे. ही संपूर्ण घटना हरियाणातील असल्याचे समजत आहे.
A Daughter torturing her Mother.
I’m shock that – it’s her own mother, NOT mother-in-law.@police_haryana@DGPHaryanapic.twitter.com/Npv8dMka2X
— ShoneeKapoor (@ShoneeKapoor) February 27, 2025
दरम्यान या घटनेचा व्हायरल व्हिडिओ @ShoneeKapoor नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 6 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत मुलीच्या या रक्षसी वर्तव्यावर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “मनोरुग्ण आई आणि सासू यांच्यात फरक करत नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे पाहण्याची माझ्यात ताकद नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे हृदयद्रावक आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.