एक चुकी अन् भावाचं आयुष्य बर्बाद! फटक्यासोबत मस्ती करायला गेला अन् थेट तोंडावरच उडाला आगीचा भडका; थरारक Video Viral
माणसाचा अतिशहाणपणा त्याला कधी ना कधी नडतोच आणि असेच काहीसे सध्याच्या व्हिडिओतही घडताना दिसून आले. आपली एक चूक आपल्याला किती महागात पडू शकते याचे जिवंत उदाहरण तुम्ही आजच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये घडताना पाहू शकता. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सर्वात धोकादायक ठरणार फटका म्हणजेच रॉकेट हातात घेऊन त्याच्याशी मस्ती करू पाहतो. विशेष म्हणजे यावेळी हा रॉकेट पेटलेला असतो… रॉकेट पेटवून त्याला तोंडात घालून व्यक्ती स्टंट कारण्याचा प्रयत्न करतो पण त्याचा हा स्टंट त्याच्यावरच उलटा पडतो आणि भयंकर गोष्ट घडून बसते ज्याचा पश्चाताप व्यक्तीला आयुष्यभर होत राहील. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
अतिशहाणा त्याचा बैल रिकामा ही म्हण तर तुम्ही अनेकदा ऐकली असेल याचेच जिवंत उदाहरण तुम्हाला या व्हिडिओत घडून येताना दिसून येईल. व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता यात एक व्यक्ती आपल्या तोंडात फटाक्याचा रॉकेट पकडून उभा आहे. मुख्य म्हणजे हा रॉकेट पेटवला गेला आहे आणि रॉकेट हवेत उडवायचा सोडून व्यक्ती त्याला तोंडात पकडून काहीतरी स्टंट करण्याचा प्रयत्न करत आहे पण खरा ट्विस्ट या व्हिडिओत इथेच घडून येतो जसजसा हा रॉकेट पेट घेत जातो तशीच अचानक आगीची एक मोठी लहर व्यक्तीच्या तोंडावर पडते आणि त्याचे संपूर्ण तोंड आगीत जळून निघते. आग आपल्या चेहऱ्यावर येत आहे हे पाहून व्यक्ती लगेच तो रॉकेट खाली फेकतो पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. व्हिडिओत पुढे काय घडले हे जरी स्पष्ट झाले नसले तरी यातील दृश्ये पाहताच व्यक्तीच्या चेहऱ्याला नक्कीच या दुर्घटनेत मोठी दुखापत झाली असावी.
दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @fireworkoops नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जर तुम्हाला वाटत असेल की ते आश्चर्यकारक होते तर तुम्ही तो दारू पिऊन काय करतो ते बघायला हवे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भावाला आता प्लॅस्टिक सर्जरीची गरज आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “काहीतरी मूर्खपणा केल्याचा परिणाम”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.