(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक अजब-गजब आणि आपल्याला थक्क करून टाकणारे दृश्य शेअर केले जातात. हे दृश्य नेहमीच आपल्या कल्पनेपलीकडचे ठरतात आणि असाच एक अचंबित करणारा आणि स्वप्नवत वाटणारा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसून आला आहे. व्हिडिओमध्ये खरीखुरी जलपरी आढळून आली आहे जिला पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन हादरून गेली आहे. जलपरी हा प्रकार आपण अनेकदा कथांमध्ये ऐकला आहे, चित्रपटांमध्ये पाहिला आहे पण ती खरंच सत्यात असते यावर आजवर कुणाचाही विश्वास नव्हता. अर्ध शरीर मानवाचं आणि अर्ध माशाचं अशा अनोख्या रचनेने बनलेली जलपरी अनेकांना आजवर काल्पनिकच वाटत चालली आहे. पण नुकतेच तिचे खरेखुरे अस्तित्व मेक्सिकोच्या एका समुद्रकिनाऱ्यावर आढळून आले आहे ज्याने सर्वांनाच हादरवून सोडले आहे.
ही घटना मेक्सिकोमध्ये घडून आली असून झालं असं की, येथील एका समुद्रकिनाऱ्यावर मच्छीमार नेहमीप्रमाणे मासे पकडण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर गेले होते. मासे पकडत असताना अचानक त्याच्या जाळ्यात एक रहस्यमयी सांगाडा अडकला. याला बाहेर काढताच हा सांगाडा एका जलपरीचा असल्याचे स्पष्ट झाले. हाडाचा आकार होता , फक्त एक मीटर, परंतु त्याची रचना पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. त्याचा खालचा भाग माशाच्या शेपटीसारखा आहे, जो खवलेने झाकलेला आहे. वरच्या भागात मानवासारखे हात आणि डोके आहे, ज्यामुळे ती जलपरी असल्याची ओळख खरी ठरते. हा जलपरीचा सांगाडा असल्याचे समजताच स्थानिक सागरी ताबडतोब या सांगाड्याला जीवशास्त्र प्रयोगशाळेत पाठवतात जिथे शास्त्रज्ञांनी त्याची तपासणी सुरू केली.
शास्त्रज्ञांच्या चाचणीत सुरवातीला हे हाड एका सजीव प्राण्याचे असल्याचे स्पष्ट झाले पण डीएनए चाचणीत काही जीन्स आढळून आल्या ज्या मासे आणि सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये असामान्य मिश्रण दर्शवत होत्या. दरम्यान हा जीव नक्की कोणत्या प्रजातीचा आहे याची पुष्टी अजूनही होऊ शकली नाही. या सांगाड्याचा संबंध १९ व्या शतकातील ‘फिजी जलपरी’शीही जोडला जात आहे. जुन्या नोंदींमध्ये ते बनावट असल्याचे वर्णन केले गेले असले तरी, हा नवीन सांगाडा खरा असू शकतो. काही यूफोलॉजिस्ट आणि क्रिप्टोलॉजिस्ट यांचा असाही विश्वास आहे की, हा सांगाडा समुद्राच्या खोलवर राहणाऱ्या जलपरी माशाच्या बाळाचा सांगाडा असू शकतो. शास्त्रज्ञांना अजूनही या सांगाड्याचे खरे अस्तित्व समजले नसले तरी याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.